खानापूर: वनवासींच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी (ता.३१) येथील तालुका पंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. पिडीतांनी मोठ्या संख्येने ऊपस्थित राहण्याचे आवाहन खानापूर तालुका वनहक्क संघर्ष समितीने केले आहे.
गेल्या वर्षभरापासून समितीच्या माध्यमातून जंगलात राहणाऱ्या गवळी-धनगर, सिध्दी आणि कुणबी मराठा समुदायाला अतिक्रमीत जमिन कायम मालकी हक्काने मिळावी, वनहक्क कायद्याची प्रभावी अमलबजावणी व्हावी, त्यांना वीज, पाणी व इतर मुलभूत सुविधा मिळाव्यात, तहसिलदारांनी वनहक्क समित्या गठीत कराव्यात आदी मागण्यांसाठी पाठपुरावा केला जात आहे. गतवर्षी २५ ऑक्टोबर रोजी त्यासाठी भव्य मोर्चा तहसिल कार्यालयावर काढण्यात आला होता. मात्र, त्याची म्हणावी तशी दखल प्रशासनाने घेतलेली नाही. आता निर्वाणीचा इशारा देण्यासाठी सोमवारी (ता.) तालुका पंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे.
तालुक्यातील समस्त वनवासींनी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सोमवारी सकाळी १०.३० वाजता ता.पं.कार्यालयासमोर हजर राहण्याचे आवाहन श्रमिक मुक्ती दलाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष संपत देसाई, खानापूर तालुका वनहक्क संघर्ष समितीचे निमंत्रक महादेव मरगाळे, अभिजीतसिंह सरदेसाई, नरेंद्र पाटील, अंकुश पाटील यांनी केले आहे.
पुन्हा का?
भुमिका / चेतन लक्केबैलकर इंटनेटच्या मायाजालाने जग अगदी जवळ आणले. इतके जवळ की, हल्ली सर्व कांही ऑनलाईन चालले आहे. गृहोपयोगी साहित्याच्या खरेदीपासून ते चक्क लग्न सोहळेही ऑनलाईन पार पडत असल्याचा हा काळ. एक काळ होता. जगभरातील घटना-घडामोडी जाणून घेण्यासाठी रेडिओवर बातम्या ऐकल्या जायच्या. प्रत्येक गावात हमखास एखादी व्यक्ती सकाळी सूर्याची कोवळी किरणे अंगावर झेलत कानाला […]