
समांतर क्रांती / खानापूर
आजपासून दहावीच्या परिक्षेला सुरूवात होत आहे. यावेळी तालुक्याचा निकाल ८५ टक्के लावण्याचे उद्दीष्ट खात्याने ठेवले आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना मुलभूत सुविधांसह कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती क्षेत्र शिक्षणाधिकारी पी. रामप्पा यांनी ‘समांतर क्रांती’ला दिली.
असे असेल नियोजन:
परिक्षा केंद्र : ११
खानापूर शहरात मराठा मंडळ, ताराराणी हायस्कूल आणि सर्वोदय हायस्कूल
ग्रामीण भागात शांतीनिकेतन, इटगी, पारिश्वाड, नंदगड, हॉलीक्रॉस बिडी, लोंढा हायस्कूल, मुगळीहाळ आणि जांबोटी हायस्कूल
परिक्षेसाठी १७४ खोल्या आरक्षीत करण्यात आल्या आहेत. तेथे ३८८३ विद्यार्थी परिक्षा देणार असून त्यात २०४ विद्यार्थी रिपीटर आहेत. त्यांच्यावर २४० पर्यवेक्षक लक्ष ठेवतील.
अशी असेल अधिकाऱ्यांची नियुक्ती :
११ मुख्य अधिक्षक, ४ उपअधिक्षक, इतर खात्यातील १४ अधिकारी परिक्षा केंद्रावर लक्ष ठेवतील. ९ रूट अधिकारी, ११ मोबाईल स्वाधीन अधिकारी, ९ भरारी पथके व ३ व्हीडीओ निरीक्षक असतील.
असे आहे वेळापत्रक:
२१ रोजी प्रथम भाषा, २४ रोजी गणित, २६ रोजी द्वितीय भाषा, २९ रोजी समाज, २ एप्रिलला विज्ञान तर ४ रोजी तृतीय भाषेचा पेपर असेल. संपूर्ण परिक्षा केंद्रावर सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.

ॲड. ईश्वर घाडी यांनी घेतली वनमंत्र्यांची भेट
समांतर क्रांती / खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावांना पक्के रस्ते, पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईन तसेच वीज वाहिन्यांच्या कामांसाठी वनविभागाने आडकाठी न आणता विकास कामांना सहकार्य करावे, अशी मागणी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड ईश्वर घाडी व भूलवाद कमिटीचे सदस्य विनायक मुतगेकर यांनी वनमंत्री ईश्वर खांडरे यांच्याकडे केली आहे. गुरूवारी (ता.२०) बेंगळूर विधानसौध येथे ॲड. घाडी यांनी […]