समांतर क्रांती वृत्त
खानापूर: जमिनीच्या वादातून चिगुळे येथे झालेल्या हाणामारीच्या प्रकरणात ३५ जणांना जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सशर्त जामिन मंजूर केला आहे. माउली मंदिर आणि देवस्थानाची जमिन यावरून गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. दि. ५ जूनरोजी त्याचे पर्यावसान मारामारीत झाले होते. मुख्य संशयीत चौगुले याच्यासह अन्य ३४ जणांनी घरावर हल्ला करून मारहाण केल्याची फिर्याद रोशना चौगुले यांनी खानापूर पोलिसांत दिली होती. या प्रकरणातील ५ जणांना पोलीसांनी अटक केली होती. तर अन्य ३० जण फरारी होते. यातील पाच जणांना नियमीत तर ३० जणांना अटकपूर्व जामिन मंजूर करण्यात आला आहे.
कर्नाटक अर्थसंकल्प: शिक्षण क्षेत्रासाठी सर्वाधिक अनुदानाची तरतूद
समांतर क्रांती वृत्तबंगळूर: मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी त्यांच्या राजकीय आणि संसदीय कारकिर्दीतील १४ वा अर्थसंकल्प मांडत यापूर्वीचा माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांच्या नावावर असलेला विक्रम मोडीत काढला. त्याच बरोबर त्यांनी अर्थसंकल्पात पहिल्यांदाच शिक्षण खात्यासाठी तब्बल ३७ हजार कोटींच्या निधीची तरतूद करीत वेगळेपण जपले. भौतिक विकासाबरोबरच राज्याच्या बौधिक विकासाकडेही तेवढ्याच गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले […]