समांतर क्रांती विशेष
मडगाव/खानापूर: कोकण रेल्वेतून सात किलो सोने असलेली बॅग चोरी केल्या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी कवठे महांकाळ, नवी मुंबई येथील दोघांसह बेळगाव आनि खानापूर येथील तरूणांना अटक केली आहे. या प्रकरणी २८ जून रोजी अक्षय राम चिनवाल (वय २८, रा.खानापूर) तर रविवारी (९ जुलै) बेळगामधून संतोष शिरतोडे याला अटक करण्यात आली आहे.
काय आहे हे प्रकरण?
काणकोण रेल्वेस्थानकावर गाडी क्रॉसिंगसाठी थांबलेली असताना २ मे २०२३ रोजी ४ कोटी रुपये किमतीचे ७ किलोचे सोन्याचे दागिने असलेली बॅग अज्ञातांकडून चोरी करण्यात आली. संपत जैन यांच्याकडे काम करणाऱ्या अशोक आर. यांनी याप्रकरणी कोकण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केलेली होती. कोकण रेल्वे पोलीस उपअधीक्षक गुरुदास कदम यांनी पोलिस निरीक्षक सुनील गुडलर व सहकाऱ्यांकडून कर्नाटक व महाराष्ट्रात याप्रकरणी तपास करण्यात आला.
गेल्या आठवड्यात याप्रकरणी चोरी करणाऱ्या अंतरराज्य टोळीचा पर्दाफाश झाला. २८ जून रोजी कवठे महाकाळ येथून संदीप वसंत भोसले (वय ४०, रा. कवठे महाकाळ-सांगली) व अक्षय राम चिनवाल (वय २८, रा.खानापूर-बेळगाव) याला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून शेवोर्लेट क्रुझ आणि मारूती रिट्झ या गाड्या जप्त करण्यात आल्या होत्या. चौकशीदरम्यान या प्रकरणात अर्चना मोरे (वय ४२, तनोजा-नवी मुंबई) हिचे नाव समोर आले. तीनेच या दोघांना सोने कधी रेल्वेने येणार याची माहिती दिली होती. तिलाही या प्रकरणी अटक करण्यात आली.
या प्रकरणातील फरारी असलेला संशयीत संतोष शिरतोड याला रविवारी (ता.९ जुलै) बेळगाव येथे अटक करण्यात आली. चारही जणांकडून आतापर्यंत १ कोटी १२ लाखांचे सोने आणि ५० हजारांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. कोकण रेल्वे पोलीस उपअधीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
बेळगाव-खानापुरात खळबळ
सुमारे ४ कोटी किमतीचे ७ किलो सोने चोरी प्रकरणात बेळगाव आणि खानापूरचे दोन तरूण गुंतल्याचे स्पष्ट झाल्याने खळबळ माजली आहे. संतोष शिरतोडे आणि अक्षय चिनवाल हे गल्या कांही दिवसांपासून छानछौकी जीवन जगत होते. अचानक त्यांच्याकडे प्रचंड पैसा आल्याने ते चर्चेत असतांनाच या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. केवळ, एका रात्रीत कोट्यधीश होण्याच्या महत्वाकांक्षेने त्यांना कारागृहाची हवा खावी लागली आहे.
सहा वर्षानंतरही शहिद जवानाच्या कुटुंबीयांची उपेक्षाच!
समांतर क्रांती वृत्त नंदगड: सहा वर्षापूर्वी हलगा (ता.खानापूर) येथील संतोष लक्ष्मण गुरव हे जवान नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहिद झाले होते. त्यावेळी केंद्र आणि राज्य शासनाकडून शहिदाच्या कुटुंबीयांवर आश्वासनांची खैरात करण्यात आली होती. पण, घोषीत झालेली एकही सुविधा त्यांना अजून मिळालेली नाही. रविवारी सहाव्या स्मृतीदिनी शहिदाच्या आई-वडिलांनी शहिद स्मारकासमोर सरकार आणि प्रशासकीय व्यवस्थानाविरोधात आक्रोश व्यक्त केला. सुरूवातीला […]