समांतर क्रांती वृत्त
40 villages in Khanapur taluka are island-like खानापूर: मणतर्गेजवळच्या पुलावर आज दुसऱ्या दिवशीही पाणी आल्यामुळे शिरोली भागातील अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे. संततधार पावसामुळे तालुक्यातील अनेक नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे सुमारे ३० ते ४० गावांना बेटाचे स्वरूप आले आहे. मणतुर्गेसह विविध पुलांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून वाहतूक बंद करण्यात आली आहे.
गेल्या महिनाभरात तालुक्यातील बळीराजाला जोराच्या पावसाची ओढ लागली होती. मंगळवारपासून तालुक्याच्या पश्चिम घाटात मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. मिनिटागणिक पाणी पातळीत वाढ होत असल्याने अनेक पुलांवर पाणी आले आहे. परिणामी, तालुक्यातील सुमारे ३० हून अधिक गावांचा शहर आणि इतर परिसराशी संपर्क तुटला आहे. दरम्यान, तालुका प्रशासनाने सर्तकता बाळगण्याचा इशारा नागरीकांना दिला आहे.
त्या साधूचे काय झाले?
हब्बनहट्टी येथील स्वयंभू मारूती देवस्थानाच्या ठिकाणी आंदोलन करीत असलेल्या कथीत साधूने अखेर तेथून माघार घेतली आहे. मलप्रभेला पूर आला असून हब्बनहट्टीतील मंदिरदेखील दरवर्षीप्रमाणे पाण्याखाली गेले आहे. साधू देवेंद्र शर्मा यांनी आंदोलनस्थळावरून माघार घेण्यास नकार दिला होता. परंतु, त्यांच्या पत्नीने हंडिभडंगनाथ येथील सिध्देश्वर मठाच्या मठाधिशांना पाचारण करून आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले. हंडिभडंगनाथ मठाधिशांनी देवेंद्र शर्मा यांना प्रवाहाबाहेर येण्याचा आदेश देत त्यांना सहकाऱ्यांच्या मदतीने दोराच्या सहाय्याने बाहेर काढले. तत्पूर्वी त्यांनी आंदोलन मागे घेण्याचे मान्य केले होते.
संततधारेमुळे घराबाहेर पडणे मुश्किल
तालुक्यात सध्या पावसाची संततधार सुरू असून नागरीकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. पश्चिम भागातील अनेक गावांत झाडे उन्मळून पडल्याच्या घटनांमुळे वाहतूक बंद आहे. शिवाय वीज पुरवठादेखील खंडीत झाला असून लोकांना अंधारात चाचपडावे लागत आहे.
शहरही गारठले!
तालुक्याच्या ग्रामीण भागासह खानापूर शहरदेखील दोन दिवसांपासून गारठले आहे. शहरात होत असलेल्या संततधार पावसामुळे बाजारपेठेतील दैनंदिन व्यवहारांवरही परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. ग्रामीण भागात भात लागवडीची लगबग सुरू झाल्यामुळे शहरातील नेहमीची गर्दी घटली आहे.
चापगाव ग्रा.पं.अध्यक्षपदी गंगव्वा कुरबर
समांतर क्रांती वृत्त चापगाव: येथील ग्राम पंचायतीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत ५ विरुध्द ४ असे मतदान झाल्याने अध्यक्षपदाच्या निवडीत गंगव्वा सिध्दप्पा कुरबर (वड्डेबैल) यांनी नजिर सनदी यांचा तर उपाध्यक्षपदाच्या निवडीत मालूबाई अशोक पाटील यांनी लक्ष्मी हणमंत मादार यांचा पराभव केला. पशू वैद्याधिकारी डॉ. उमेश होसूर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. ग्रा.पं.सदस्य नागराज यळ्ळूकर, सूर्याजी […]