7 ministers, 35 MLAs at Jarkiholli’s house बंगळूर: मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी मंत्रीमंडळात खांदेपालट करण्याचे संकेत दिले आहेत. आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाची चर्चा रंगात आहेत. अशातच गुरूवारी (ता.२) रात्री बंगळूर येथील मंत्री सतिश जारकीहोळ्ळी यांच्या घरी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्यासह सात मंत्री आणि ३५ आमदारांनी ‘पार्टी’ केली. प्रदेशाध्यक्ष उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार परदेश दौऱ्यावर असतांनाच हे घडल्याने चर्चांना ऊत आला आहे.
मुख्यमंत्री बदलाची चर्चा, मंत्रीमंडळाचा विस्तार आणि प्रदेशाध्यक्ष निवडीचे गुऱ्हाळ यामुळे सध्या काँग्रेसच्या गोटात गोंधळ माजला आहे. मंत्रीमंडळ विस्तारात महाराष्ट्राच्या धर्तीवर आणखी एक उपमुख्यमंत्रीपद निर्माण करण्यासाठीचे प्रयत्नही सुरू आहेत. या मेजवाणीला मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्यासह मंत्री डॉ. जी.परमेश्वर, के.एन.राजण्णा, एच.एस.महादेवप्पा यांच्यासह एकूण सात मंत्री व ३५ आमदार उपस्थित होते.
वर्षारंभी उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार मंत्रीमंडळ बैठकीनंतर परदेश दौऱ्यावर गेले आहेत. मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या गटातील मंत्री-आमदारांनी ही संधी साधली आहे. मंत्री जारकीहोळ्ळी यांच्या कार्यालयाकडून ही मेजवाणी नववर्षानिमित्त असल्याचे सांगण्यात आले असले तरी काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. या मेजवाणीदरम्यान काय खलबते झाली, याबाबत मात्र अद्याप कुणीच वाच्यता केलेली नाही. दरम्यान, काँग्रेसच्या दोन्ही गटात रस्सीखेच सुरू असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.
त्या संशयीत आरोपींना त्याचे गुप्तांग दाबून खून करायचा होता…
समांतर क्रांती / खानापूर तालुक्यातील देवलत्ती येथील तरूणाचे अपहरण करुन बेदम मारहाण करण्यात आल्याच्या घटनेतील भयानकता समोर आली आहे. जखमी महेश नारायण सिमनगौडर (वय ३५) याने दिलेल्या तक्रारीत, त्याचे गुप्तांग दाबून संशयीतांनी त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या घटनेतील संशयीत आरोपींना तात्काळ जेरबंद करण्यात यावी, अन्यथा देवलत्ती गावातील व्यवहार बंद ठेवून आंदोलन […]