76.52 percent polling from Uttara Kannada. कारवार: उत्तर कन्नड लोकसभा मतदार संघासाठी झालेल्या निवडणुकीत चुरशीने ७६.५२ टक्के मतदान झाले आहे. तर खानापूर तालुक्यातील २ लाख १९ हजार ४४२ मतदारांपैकी १ लाख ६१ हजार ९१३ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. वाढलेली टक्केवारी नेहमीच सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला मारक ठरते, तसे झाल्यास पुन्हा काँग्रेस उत्तर कन्नडचा गड काबीज करण्यात यशस्वी होणार आहे, असे राजकीय समिक्षकांचे मत आहे.
उत्तर कन्नड मतदार संघातून काँग्रेसच्या डॉ. अंजली निंबाळकर, भाजपचे विश्वेश्वर हेगडे कागेरी तर म.ए.समितीचे निरंजन सरदेसाई यांच्यासह अन्य दहा उमेदवार रिंगणात होते. मात्र येथील लढत दुरंगी झाली. मतदानादिवशी भर उन्हातही मतदारांनी उत्स्फूर्दपणे मतदानाचा हक्क बजावला. संपूर्ण मतदार संघात सकाळी ११ पर्यंत २७.६५ टक्के मतदान झाले होते, तर दुपारी एकपर्यंत ४४.२२ टक्के मतदारांनी हक्क बजावला होता. तांत्रिक अडचणींमुळे कांही ठिकाणी उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया चालली. दरम्यान, संपूर्ण मतदार संघात एकुण ७३.५२ टक्के मतदान झाले.
- विधानसभा मतदार संघनिहाय टक्केवारी
- खानापूर ७१.८७
- कित्तूर ७५.८५
- शिरसी ७६.६०
- यल्लापूर ७९.००
- कारवार ७१.६१
- कुमठा ७०.१०
- हल्याळ ७२.२५
- भटकळ ७३.०२
खानापूर तालुक्यात ७७ टक्के
उत्तर कन्नड मतदार संघातील बहुतेक सर्वच विधानसभा मतदार संघात ७० टक्क्यांहून अधिक मतदान झाले. त्यातही खानापूर तालुक्यातून सर्वाधिक ७७.२३ टक्के मतदान झाले आहे. आतापर्यंतच्या इतिहासातील हे सर्वाधिक मतदान आहे. १ लाख १२ हजार ४६९ पैकी ८३ हजार ४०७ तर १ लाख ६ हजार ९६८ पैकी ७८ हजार ५०५ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. महिला आणि पुरूषांची टक्केवारी सारखीच असल्याने याचा फायदा- तोटा कुणाला होणार याची गोळाबेरीज केली जात आहे.
कुप्पटगिरी आणि खानापूर शहरातील मारूती नगर केंद्रावर कांही काळ मतदान यंत्र बंद पडल्याच्या घटना वगळता तालुक्यात इतर ठिकाणी मतदान शांततेत पार पडले. दरम्यान, निट्टूरसह कांही ठिकाणी मतदान केंद्रावर भाजपचे कार्यकर्ते राजरोसपणे नियमांचे उल्लंघन करीत भाजपचा प्रचार करीत होते. डॉ. निंबाळकर यांनी अशी घटना निट्टूर येथे उघडकीस आणली.
उत्तर कन्नड लोकसभा: मतदान यंत्रात काय दडलंय?
महिलांचा वाढलेला टक्का, कुणाला धक्का? विशेष रिपोर्ट / चेतन लक्केबैलकर पद्मश्री सुक्री गौडा यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदनाचा हक्क बजावता आला नाही. आधीच आजारपणामुळे त्या अत्यवस्थ आहेत, त्यात मतदानाचा हक्क बजावता न आल्याने त्या आणखी अस्वस्थ झाल्या आहेत. पद्मश्री या देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानीत महिलेला मतदानाचा बहुमोल हक्क बजावता येत नाही, ही किती मोठी दुर्दैवी […]