समांतर क्रांती वृत्त
खानापूर: चापगाव येथील रमेश तुकाराम पाटील यांच्या घरी चोरी झाल्याची घटना रात्री घडली. रमेश पाटील यांचे घर यडोगा रोडला घर आहे. ते काल कुटुंबियांसह बाहेरगावी गेले होते. रात्री अज्ञात चोरट्याने घराचा समोरील कुलूप तोडून घरात प्रवेश केला. आतील तिजोरी फोडून त्यातील दागिने व किमती वस्तू लंपास केल्या आहेत. पाळत ठेवून ही चोरी केली गेल्याचा संशय आहे.काही दिवसांपूर्वी येथे चोरीचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्राम पंचायत माजी अध्यक्ष रमेश धबाले यांनी केली आहे.
..म्हणून खानापूर तालुक्यातील ‘या’ गावांमधील तरूणांची लग्नं होत नाहीत!
संडे स्पेशल/ चेतन लक्केबैलकर खानापूर: भौगोलिक सलगता असतांनाही खानापूर तालुक्याच्या पश्चिम घाटाला बेटांचे स्वरूप येते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांनाही या भागात अजून मुलभूत सुविधा पोहचलेल्या नाहीत. पावसाळ्यातील नागरीकांचे जीवन सर्वसामान्यांच्या अंगावर काटे उभे करते. अदिवासी जमातींपेक्षाही भयावह वाटेल, असं येथील जीवनमान आहे. नेमीची येतो पावसाळा आणि त्याबरोबर तालुक्याच्या पश्चिम घाटातील समस्याही चर्चेत येतात. उन्हाळा […]