समांतर क्रांती वृत्त
लोंढा: वन परिक्षेत्रातील राजवाळ-गवळीवाड्याच्या परिसरात गेल्या कांही दिवसांपासून एका बिबट्याने ठाण मांडले आहे. कांही नागरीकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न त्याने केल्याने परीसरात भितीचे वातावरण आहे. वनविभागाने त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
गावापासून जवळच झाडीत हा बिबट्या वावरत असून तो राजरोसपणे संचार करीत आहे. लोकांची चाहूल लागल्यानंतर तो प्रचंड ओरडत आहे. तसेच हल्ल्याचा प्रयत्न करीत आहे. दोन दिवसांपासून अशी घटना घडल्यानंतर नागरीकांत भितीचे वातावरण आहे. गवळीवाड्यावर मोठ्या प्रमाणात जनावरे असून त्यांच्यावरदेखील हल्ल्याची शक्यता असल्याने नागरीक हवालदिल झाले आहेत. सदर बिबट्या जखमी असावा, त्यामुळे तो त्याच परिसरात ठाण मांडून आहे, असे सांहितले जात आहे. लोंढा वनविभागाने त्याचा बमदोबस्त करून नागरीकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
लोंढा विभागाशी यासंदर्भात संपर्क साधला असता, आमच्याकडे अद्याप याबाबत कुणीही तक्रार केलेली नाही. तरीही याची चौकशी करून बिबट्याचा बंदोबस्त केला जाईल, असे सांगण्यात आले.राजवाळ गवळीवाडा येथील भैरू पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बिबट्याने रविवारी सकाळी दोघांवर हल्ल्याचा प्रयत्न केला मात्र ते सहिसलामत पळून गेल्याचे सांगितले.
शिंबोळी...तळत्री.. हैदोस का?
समांतर क्रांती विशेष कणकुंबी: दोन वर्षांपासून रस्त्याच्या मागणीसाठी चोर्ला महामार्ग रोखणारे मान गावचे नागरीक कुणाला आठवत नसतीलच! का आठवतील? त्याच नागरीकांनी शहरातून उनाडक्या करण्यासाठी आलेल्यांना समजूतीच्या चार गोष्टी सांगितल्या तर त्या रूचत नाहीत. त्यांची बाजू घेऊन शासन-प्रशासनाशी भांडावं असं तरूणाईला का वाटत नाही? चला तर मग थेट जाऊ या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी चक्क मान या […]