समांतर क्रांती वृत्त
Extreme step taken by married woman, husband and father-in-law arrested नंदगड: स्वयंपाक करता येत नाही, असा आळ घेत होणाऱ्या जाचाला कंटाळून विवाहीतेने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना गुंडपी (ता.खानापूर) येथे घडली. सबा मुजावर असे या विवाहीतेचे नाव असून तिचा पती मुजाहिद्दीन आणि सासरा शब्बीर मुजावर यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, पती आणि सासू-सासऱ्याने शबा हिचा छळ चालविला होता. याबाबत तीने यापूर्वी तिची आई बसेरा साहेबखान यांना सांगितले होते. स्वयंपाक करता येत नाही म्हणत तिला मारबडव केली जात होती. तसेच घराबाहेर पडण्यासही मज्जाव करण्यात आला होता. दरम्यान, नेहमीच्या जाचाला कंटाळून सबा हिने राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत तिच्या आईच्या फिर्यादीवरून पती आणि सासऱ्यास अटक करण्यात आली. त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. नंदगड पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.
2 thoughts on “विवाहीतेने उचलले टोकाचे पाऊल, पती-सासऱ्यास अटक”