समांतर क्रांती वृत्त
Burglary in Manturge, jewels worth lakhs looted खानापूर: तालुक्यातील मणतुर्गे येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे ५ लाखांच्या दागिण्यांवर डल्ला मारला. तसेच सहा हजारांची रोकडदेखील लंपास केली. अल्मेट मानू सोझ यांच्या आसोगा रोडवरील घरात ही चोरी झाली असून या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, सोझ यांचे घर आसोगा रोडला लागून आहे. हा परिसर निर्मष्य असतो. त्यांचे कुटुंबीय सकाळी शिवारात कामासाठी गेले असतांना ही चोरी करण्यात आली असावी. चोरट्यांनी घराच्या समोरील दरवाजाचा कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील तिजोरी फोडून त्यातील ८ तोळे सोन्याचे आणि १२ तोळे चांदिचे दागिणे तसेच सहा हजारांची रोकड पळविली. खोलीतील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडले होते.
सायंकाळी शिवारातील कामे आटोपून सोझ कुटुंबीय घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. लागलीच घटनेची माहिती खानापूर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. सदर घर गावाच्या बाहेर असल्याचा फायदा उठवित चोरट्यांनी चोरी केली. गेल्या कांही दिवसांपासून तालुक्यातील विविध गावात चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरीकांत घबराट पसरली आहे. चोरट्यांचा विनाविलंब बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
Hi