समांतर क्रांती वृत्त
खानापूर: जैन मुनी कामकुमार नंदी यांच्या हत्येची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली. यासंदर्भात तहशिलदारांना निवेदन सादर करण्यात आले. महालक्ष्मी मंदिरपासून तहशिलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढून या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. भाजप तालुकाध्यक्ष संजय कुबल आणि भाजप नेता पंडीत ओगले यांच्या नेतृत्वाखाली कांही काळ रास्तारोकोही करण्यात आला.
यावेळी आवरोळी काडसिध्देश्वर मठाचे चन्नबसवदेवरू स्वामी, माजी आमदार अरविंद पाटील, भाजप नेते शरद केशकामत, बाबुराव देसाई, मल्लाप्पा मारिहाळ, किशन चौधरी, जे.डी.पाटील, संजय कंची यांच्यासह हिंदू संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. संशयीतांना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली असून निवेदन स्विकारून त्याचा पाठपुरावा करण्याची ग्वाही तहशिलदारांनी दिली आहे.
हत्तरगुंजी फाट्याजवळ अपघात
समांतर क्रांती वृत्त खानापूर: गणेबैलजवळ दुचाकी दुभाजकाला आदळल्याने झालेल्या अपघातात बिडी येथील तरूण योगेश गुंडू पालेकर जखमी झाल्याची घटना घडली. तो दुचाकीवरून हत्तरगुंजीहून गणेबैलकडे जात होता. हत्तरगुंजी ते गणेबैलदरम्यान सेवारस्ता नाही. त्यामुळे वाहनचालकांना चुकीच्या दिशेने ये-जा करावी लागते. योगेश चुकीच्या दिशेने जात असतांना समोरून आलेल्या वाहनाला चुकविण्याच्या नादात त्याच्या दुचाकीने दुभाजकाला धडक दिली. त्यात तो […]