समांतर क्रांती वृत्त
जांबोटी: तालुक्यातील आमटे ग्राम पंचायतीच्या अध्यक्षपदी सरस्वती कृष्णा भरणकर तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण बाळकृष्ण गुरव यांची अविरोध निवड झाली. अध्यक्षपदासाठी अवर्ग महिलेसाठी आरक्षण जाहीर झाले होते. सरस्वती भरणकर या एकमेव असल्याने त्यांना संधी मिळाली. तर उपाध्यक्षपदासाठी मागासवर्गीय आरक्षण होते. सदस्यांनी एकमतांने लक्ष्मण बाळकृष्ण गुरव यांना उपाध्यक्ष म्हणून संधी दिली.
निवडणूक अधिकाऱ्यांनी निवड जाहीर केल्यानंतर विकास अधिकारी श्री. मोकाशी यांनी उभयतांचे अभिनंदन केले. यावेळी सरस्वती भरणकर यांनी कोणत्याही प्रकारचा पक्षभेद न मानता पंचायत अखत्यारीतील सर्वच गावांत प्रामाणिकपणे विकासकामे राबविण्याची ग्वाही दिली. यावेळी महादेव गावकर, कृष्णा भरणकर, चिदंबर गावकर, प्रकाश गुरव, गंगाराम गावडे, सूर्यकांत कुलकर्णी, ॲड. आर.एम.पाटील, उद्योजक बसवराज हप्पळी, मारूती पाटील, नारायण कालमणकर, निंगाप्पा पाटील, अशोक गावकर, अर्जून गावडे यांच्यासह सदस्य पार्वती नाईक, सविता गावकर, प्रज्वला नाईक, सरस्वती कोलकार, नागोजी पाटील, काशीनाथ शिवणगेकर आणि मारूती गावकर उपस्थित होते.
‘विठ्ठला’… बडव्यांना कधी हटविणार?
समांतर क्रांती विशेष खानापूर: हा तालुका म्हणजे सरकारी अधिकारी, त्यांचे स्थानिक दलाल आणि लोकप्रतिनिधींच्या सेवेचा आव आणणाऱ्या लाळपुस्यांचे कुरण झाला आहे. लोकप्रतिनिधी बदलतात, पण परिस्थिती जैसे थेच राहते. भाजपचे विठ्ठल हलगेकर यांनी आमदारकीची सूत्रे स्विकारून तीन महिन्यांचा कालावधी उलटत आला. तरीही तालुक्यात कांही बदल होतील, अशी आशा राहिली नाही. तसे वातावरण त्यांनी स्वत:च निर्माण करून […]