खानापूर: कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटनेची खानापूर शहरात चिरमुर गल्ली येथील ज्ञानेश्वर मंदिरामध्ये मासिक बैठक नुकतीच पार पडली. संघटनेचे अध्यक्ष श्री.बनोशी आणि प्रमुख पाहुणे तोपिनकट्टी महालक्ष्मी संस्थापक संचालक चांगाप्पा निलजकर, अरविंद कुलकर्णी, सुभाष देशपांडे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि श्री देवेगौडा चारिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलचे बेळगाव येथील डॉ. फरात मुल्ला व डॉ. नागराज राठोड यांच्या उपस्थितीत भव्य असा जनहित व जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचा शुभारंभ श्रीमती उमा अंगडी यांच्या ईश्वर स्तवन व स्वागत गीताने झाले. प्रास्ताविक संघटनेचे उपाध्यक्ष आबासाहेब दळवी यांनी स्वागत आणि कार्यक्रमाचा अहवाल सादर केला. अरविंद कुलकर्णी हे खानापुरातील एक उद्योजक आहेत, तसेच व्यक्ती विकासासाठी पतंजली योग संस्थेच्या माध्यमातून खानापूर या ठिकाणी योगाची प्रशिक्षण देतात. त्यांचा संघटनेमार्फत सत्कार करण्यात आला. तसेच सुभाष देशपांडे हे पतंजली योगगुरु आहेत मांगरीश हॉल योग प्रशिक्षणास नेहमी मोफत खुला करून देत असतात. श्री देवेगौडा चारिटेबल हॉस्पिटल बेळगाव ही संस्था बेळगाव जिल्ह्यामध्ये आयुष्यमान भारत व हेल्थ कार्ड करून नोंदणीकृत सदस्यांना सवलतीमध्ये इलाज उपचार केला जातो.
या संघटनेने ज्येष्ठ नागरिकांचा जन्मदिन साजरा करण्याची योजना सुरू केली. प्रथमच हलशी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एल .डी. पाटील यांचा जन्मदिन सोहळा उत्साहाने संपन्न करण्यात आला. तसेच या महिन्यामध्ये जन्मदिन असणाऱ्यांचे जन्मदिन ऑगस्ट मासिक बैठकीमध्ये करण्याची ठरले.योग गुरूंच्या समवेत जागतिक योगा दिन योगासने ,प्राणायाम, प्रत्याहार याची प्रात्यक्षिके करण्यात आली. श्री देवेगौडा चॅरिटेबल ट्रस्ट च्या डॉक्टरांच्या कडून मोफत आरोग्य तपासणी व बीपी व शुगर तपासून मोफत औषधे व हेल्थ कार्ड आयुष्मान भारत कार्ड करिता नोंदणी करण्यात आली. यावेळी ७० नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला व योगा अभ्यास करण्यात आला.
अध्यक्षांनी या महिन्याचे उपक्रमामध्ये मोफत नेत्र तपासणी व उपचार आणि मोफत चष्मे देण्याकरिता शिबिर भरवण्याचे आवाहन केले आहे तसेच नवीन सभासद जास्तीत जास्त नोंदणी करावे असे आव्हान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आले आणि सहकारी सोसायटीच्या सभासद नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले. श्री एल डी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डी. एम .भोसले प्राथमिक जेष्ठ शिक्षक संघटना अध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि या संघटनेचे जनरल सेक्रेटरी श्री.पवार, जॉइंट सेक्रेटरी बेनकटी , वाघमारे , जिगजीनी, कोळींदरे , सावंत महिला प्रतिनिधी एलिन बोरजिस संघटनेतील सर्व पदाधिकारी व सर्व सभासद उपस्थित होते
‘हे’ काय करताहेत सुनिल देसाई?
समांतर क्रांती / रविवारची मुलाखत अलिकडे बांधावरच्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. तशीच पंचायतीच्या कार्यालयात आणि गावाच्या पारावर बसून विकासाच्या गप्पा हाणणारेही ‘पायलीस पंधरा’ मिळतील. पण, खूप कमी सदस्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पंचायतीचे कार्यालय दणाणून सोडतांनाच प्रत्यक्ष विकास कामावर हातात टिकाव आणि फावडा घेऊन कामाला लागतात. जांबोटी ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची नुकताच निवड झाली. यात जास्त चर्चेत […]