समांतर क्रांती वृत्त
लोंढा: नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न अशी खानापूर-महामार्गाची अवस्था झाली आहे. आधीच काम अर्धवट आहे, त्यात आज सकाळी लोंढाजवळील नव्याने बांधण्यात आलेला पूल कोसळला आहे. रस्त्यादेखील खचला असून वाहतूक पर्यायी मार्गांनी वळविण्यात आली आहे. कंत्राटदार आणि महामार्ग प्राधिकरणाच्या अंदाधुंद कारभाराचा फटका प्रवाश्यांना बसत आहे.
दुथडी भरलेली नदी; तरीही १० कि.मी.पोहून जीव वाचविला
समांतर क्रांती वृत्त खानापूर: तालुक्यात सध्या पावसाने थैमान मांडले आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अशातही खोळंबलेल्या शेतीच्या कामांना वेग आला आहे. मलप्रभा नदी काठावरील शिवारात काम करतांना पाय घसरून बैल पाण्यात पडला. या बैलाने अत्यंत जिकरीने दुथडी भरून वाहणाऱ्या आणि वेगवान प्रवाह असणाऱ्या १० कि.मी.चे अंतर पोहत जाऊन स्वत:चा जीव वाचविल्याची घटना आज रविवारी […]