समांतर क्रांती वृत्त
खानापूर: अंगणवाडी भरतीसाठी कन्नडसक्तीवरून मराठी भाषिकांत संताप होता. मराठी संघटनांनी त्याविरोधात आवाज उठवावा ही रास्त मागणी मराठी भाषकांतून होत होती. मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानने यासंदर्भात व्यापक बैठक घेऊन त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन सादर केले होते. प्रतिष्ठानपाठोपाठ आता खानापूर तालुका म.ए.समितीनेदेखील महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना निवेदन सादर करून ही अट काढून टाकण्याची मागणी केल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. खरंतर या विषयावरून संपूर्ण सीमाभागात आंदोलन करण्याची गरज असतांना केवळ एकाच तालुका समितीकडून निवेदने देण्यात येत आहेत. हेही नसे थोडके, म्हणत मराठी भाषिक याबाबत समाधान व्यक्त करीत आहेत.
अंगणवाडी सेविका आणि सहायकांच्या भरतीसाठी प्रथम अथवा द्वितीय भाषा कन्नड असावी, अशी सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मराठी भाषिक इच्छूकांवर अन्याय होणार हे निश्चित आहे. त्यामुळे हा नियम शिथील करावा, अशी मागणी सर्वप्रथम मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आली होती. त्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची तयारीही प्रतिष्ठानने केली होती. आता महाराष्ट्र एकिकरण समितीने तिच मागणी लावून धरत सोमवारी (ता. ०७) महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी, माजी आमदार दिगंबर पाटील यांच्यासह समिती नेते उपस्थित होते.
अरविंद पाटील खासदारकीच्या रेसमध्ये?
समांतर क्रांती / कारण राजकारण – चेतन लक्केबैलकर पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. काँग्रेस आणि भाजपने उमेदवार निवडीसाठीच्या हालचालींना सुरूवात केली आहे. केवळ हिंदूत्व या मुद्यावर सहावेळा संसदेतील खूर्ची गरम केलेले खासदार अनंतकुमार हेगडे यांना यावेळी भाजपकडून डच्चू मिळणार हे निर्विवादपणे स्पष्ट झाले असल्याने भाजपने नव्या उमेदवाऱाच्या शोधाला सुरूवात केली […]