पुणे: रेन्बो रिसार्ट लोणावळा येथे तायकॉन इंडिया फेडेरेशनची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा विविध राज्यातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. तायकॉन इंडिया फेडेरेशनचे महासचिव अॅड. राज वागदकर यांनी या सभेला सुरुवात केली. यावेळी या सभेचे अध्यक्षस्थान रवींद्र चोथवे यांनी भूषविले. या सभेला संचालक म्हणून प्रभाकर ढगे उपस्थित होते. सभेच्या सुरूवातीस तायकॉन इंडिया फेडरेशनचे प्रशासकीय प्रमुख संतोष बसवंते यांनी सर्वांचे स्वागत केले.
ॲड. राज वागदकर यांनी प्रास्तविक करताना सांगितले की, तायकॉन हा कोरियाचा पारंपरिक खेळ आहे. युनेस्कोने त्यास कोरियाचा वारसा खेळ म्हणून मान्यता दिलेली आहे. मार्शल आर्ट या प्रकारातील हा खेळ खेळण्यास अतिशय सोपा असून कोरियानेच विकसित केलेल्या हापकिडो बॉक्सिंगला तो पूरक आहे. कौशल्यपूर्ण, लयबध्द तथा वेगवान हालचालीसाठी ओळखला जाणारा तायकॉन केवळ कोरियातच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडात वेगाने लोकप्रिय होतो आहे. तायकॉन व हापकिडो बॉक्सिंग हे दोन्ही खेळ परस्परपूरक असल्यामुळे आम्ही त्यास प्रोत्साहन देण्याची गरज आहे.आशियातील खेळांचे नेतृत्व करण्याची क्षमता भारताकडे आहे हे गेल्या कित्येक वर्षात आपण अनेक खेळांच्या बाबतीत सिद्ध केले आहे. हापकिडो बॉक्सिंगच्या वाढीसोबतच तायकॉन या खेळालाही सोबत घेऊन जाऊ आणि त्यात यशस्वी होऊ, असा विश्वास प्रभाकर ढगे यांनी यावेळी व्यक्त केला.
रवींद्र चोथवे यावेळी म्हणाले, जपानी वसाहतवादाच्या काळात खेळांच्या माध्यमातून जनतेचा राष्ट्रवाद जागविण्याचे काम कोरियात झाले. त्यात तायकॉन या खेळाचे मोठे योगदान आहे.तायक्यॉन हा खेळ ग्रँडमास्टर सॉन्ग देओक की यांच्या नंतर कोरियन सरकारने सन १९०० च्या काळात या खेळास वारसा खेळ म्हणून मान्यता दिली. या खेळाचा भारतभर तसेच संपूर्ण दक्षिण आशियात प्रचार व प्रसार करण्यासाठी तायकॉन आंतरराष्ट्रीय संघटनेने अॅड. राज वागदकर यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपविली आहे.
राजेश्वरी कोठावळे म्हणाल्या की, हापकीडो बॉक्सिंग आणि तायकॉन हे दोन्ही खेळ महिला व मुलींसाठी स्वयंसंरक्षणासाठी अतिशय उपयुक्त असल्याने या दोन्ही संघटनेत देशभर महिलांचे प्रतिनिधीत्व वाढविणे गरजेचे आहे.
यावेळी तायकॉन खेळ विकसित करण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले. या सभेस महाराष्ट्र हापकिडो बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार, राजस्थानचे जितेंद्र सिंग, कर्नाटकचे प्रिजो जॉनी, मध्य प्रदेशचे सी. पी. सिंग यांच्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्हा प्रमुख उपस्थित होते. राजेश्वरी कोठावळे यांनी सर्वांचे आभार मानले.
मुठभर गाव, त्याला २०० वर्षांचा इतिहास, पण..
समांतर क्रांती विशेष खानापूर: तालुक्यातील अनेक गावांना ऐतिहासिक महत्व आहे. पण, सर्वसामान्यांना त्याबद्दल माहितीच नाही. गेल्या कांही दिवसांपासून जांबोटीजवळच्या चिरेखाणी गावाची चर्चा सुरू झाली आहे. अर्थातच ही चर्चा तेथील समस्यांमुळे आणि मागासलेपणाबद्दल होत आहे. परंतु, या गावाला ऐतिहासिक महत्व प्राप्त आहे, याची माहिती कुणालाच नाही. जांबोटी संस्थानातील हे महत्वाचे गाव आहे. त्याला २०० वर्षांचा इतिहास […]