समांतर क्रांती वृत्त
नंदगड: नागरगाळीचे जंगल हे सागवानसाठी प्रसिध्द आहे. नेहमीच तेथे सागवानची तस्करी होत असल्याच्या तक्रारी वनखात्याकडे येत असतात. त्यावरून आज वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी कृष्णानगर (गवळीवाडा) येथे तीन घरांवर धाड टाकून सागवानच्या लाकडासह जंगली डुक्कराचे मटन जप्त करून तीघांना ताब्यात घेतल्याची माहिती वनक्षेत्रपाल रत्नाकर ओब्बन्नावर यांनी दिली.
मिळालेल्या माहितीवरून कृष्णनगर येथील गंगाराम बोडके यांच्या घरी छापा मारला असता त्यांच्या घरी सहा नग सागवानसह सुमारे अर्धा किलो डुक्कराचे मटन आढळून आले. धोंडू गावडे यांच्याकडे १० नग तर ज्ञानेश्वर बम्मू वरक यांच्याकडेही सागवानचे नग आढळून आले. त्यांच्यावर वन खात्याच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू असल्याचे रत्नाकर ओबन्नावर यांनी ‘समांतर क्रांती’ला सांगितले.
Fantastic article! The information you provide is important. Thank you for sharing!