समांतर क्रांती वृत्त
खानापूर: मान्सून लांबल्यामुळे हावलदिल झालेल्या बळीराजाला जुलै महिन्यातील पावसाने दिलासा दिला होता. तरीही भात लागवड लांबलीच, आता कुठे भात लागवडीची कामं हातावेगळी करीत असतांना पुन्हा पावसाने हुलकावणी दिली आहे. तालुक्यातील सुमारे ३२ हजार हेक्टरमध्ये यंदा भात पेरणीसह लागवड करण्यात आली आहे. पण, पावसाअभावी भात पिक करपून जाऊ लागल्याने शेतकरी हत:श झाला आहे. आणखी आठ दिवस पावसाने दडी मारल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार हे निश्चित आहे.
जमिनीला भेगा; डोळ्यात पाणी
भात लागवड संपली असतांनाच पावसाने दडी मारली. चक्क आक्टोबर हिटचा अनुभव येत असून जमिन भेगाळू लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आहे. मान्सून लांबला तरी जुलै महिन्यातील पावसाने दिलासा दिला होता. श्रावणातील सणांच्या तयारी लागलेल्या बळीराजावर करपलं रान देवा, सुकलं शिवार म्हणायची वेळ आली आहे.
भाजीपाला महागला
उन्हाच्या झळा इतक्या प्रचंड आहेत की, भाजीपालादेखील सुकू लागला आहे. बाजारात झाल्यांची आवक कमी झाली असून भाजीपाला महागल्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. त्यामुळे सध्या रानभाज्यांवर गुजरान करण्याची वेळ ग्रामीण भागातील जनतेवर आली आहे. येत्या दोन दिवसात पाऊस होईल, असा अशावाद कृषी खात्याचे उपसंचालक दामू चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेस है तो सब मुमकीन है: डॉ.अंजली निंबाळकर
समांतर क्रांती वृत्त खानापूर: राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधकांच्या बुडाला जणू आग लागली होती. पाच योजना कशा राबविणार असा प्रश्न विचारीत मोर्चे आंदलने केली जात होती. पण, आज त्याच योजनांचा लाभ घेऊन राज्यातील जनता खूष आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना तोंड दाखवायलाही जागा राहिलेली नाही. जनतेची दिशाभूल करण्यात भाजपचे नेते कोणत्या थराला जातात, हे जनतेला […]