बेळगाव: जानेवारी महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध जारी केले होते. १६ जानेवारी २०२२ रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला होता. त्यावेळी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. माजी आमदार अनिल बेनके व धर्मवीर छत्रपती संभाजीराजे सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधव, नगरसेवक जयतीर्थ सौंदत्तींसह इतर दहा कार्यकर्त्यांच्यावर खटला भरण्यात आला होता. कॅम्प पोलीस स्थानकात धर्मवीर संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त पूजन केल्याबद्दल हा गुन्हा नोंद करण्यात आल . कोर्टाचे कामकाज ॲड. धनकुमार पाटील हे पाहत असून त्यांनी पुढील लढा उच्च न्यायालयात लढला जाईल, असे सांगितले.
आमदारांना ‘या’ कार्यालयाचे वावडे का?
समांतर क्रांती वृत्त खानापूर: तालुक्याचे नुतन आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या ‘शासकीय’ संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज मोठ्या थाटात झाले. आमदारांसाठी तालुका पंचायत आवारात शासकीय कार्यालय असतांनाही त्या कार्यालयालयाला त्यांनी फाटा दिला. यापूर्वीच्या आमदारांचा कित्ता त्यांनी गिरवित तालुका पंचायतीच्या आवारातील कार्यालय टाळले. त्यामुळे पुन्हा एकदा आमदारांना या कार्यालयांचे वावडे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पूर्वीपासून आमदारांसाठीचे […]