समांतर क्रांती वृत्त
खानापूर: आमदारांना तालुका पंचायतीच्या आवारातील कार्यालयाचे वावडे का? असा प्रश्न ‘समांतर क्रांती’ने उपस्थित केला होता. त्यावर आता चक्क मागासवरर्यीय कल्याण खात्याने प्रश्न उपस्थित केला आहे. देवराज अर्स कार्यालयात आमदारांचे कार्यालय सुरू करण्यास संधी नाही, असे आमदार विठ्ठल हलगेकर यांना एका पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. त्याशिवाय आवघ्या दुसऱ्या दिवशी हे कार्यालय टाळेबंद करण्यात आल्याने भाजपवर मामुष्की ओढवली आहे.
कॉग्रेसने याबाबत आंदोलन छेडण्याचा आदेश दिल्यानंतर आमदारांच्या कार्यलयाबाबत मागासवर्गीय खात्याने हे कार्यालय बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले. पुढील कारवाई टाळण्यासाठी उद्घाटनाच्या आवघ्या दुसऱ्याच दिवशी हे कार्यालय बंद करण्यात आले आहे. याबाबत भाजपच्या नेत्यांनी मौन पाळले आहे. त्यामुळे यामध्ये पाणी मुरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
आमदारसाहेब, जरा सबुरीने घ्या की!
गावगोंधळ/ सदा टीकेकर लाखभर मते मिळाल्याचा आनंद क्षणभंगूर असतो. कारण, तेवढ्या लोकांच्या आपेक्षा पूर्ण कराव्या लागतात. त्यांच्या आपेक्षा पूर्ण करतांना एखादा सक्षम आमदार किंवा खासदार त्या परिक्षेत पास होतो. पण, ज्यांची कुवत नाही त्यांचे काय? अगदी असाच प्रश्न सध्या तालुक्यावासीयांना पडून राहिला आहे. कालच्या घटनेवरून तर आमदार विठ्ठल हलगेकर यांची होती नव्हती, ती सगळीच गेली. […]