- अभिलाष हिंदूराव देसाई, अध्यक्ष छत्रिय मराठा परिषद, खानापूर तालुका
कांही माणसं विशिष्ठ अशा ध्येयाने प्रेरीत होऊन समाजसेवा करीत असतात. त्यातीलच एक नाव म्हणजे सुरेशरावजी साठे. छत्रिय मराठा परिषदेचे कर्नाटक राज्याचे अध्यक्ष श्री. सुरेशरावजी साठे यांचा आज शनिवारी (ता.१३) ५९ वा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्यासाठीचा हा शुभेच्छापर लेखनप्रपंच..
महाराष्ट्राच्या तुलनेत कर्नाटक आणि इतर राज्यातील छत्रिय मराठा समाज विखुरला आहे. तो आजही एकसंघ नाही. विशेषत: कर्नाटकातील मराठा समाज विविध भागात आहे. त्यांची नाळ आजही छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेशी जोडली गेली आहे. त्यांच्या संस्कृतीतून ती नेहमीच अधोरेखीत होत असते. कर्नाटकातील मराठा समाज एकवटला पाहिजे. तो एकवेळ अल्पसंख्य असला तरी चालेल, पण राज्यात मराठ्यांना सोयी-सुविधा मिळाल्या पाहिजेत. मराठा उद्योजक, सरकारी नोकरदार असले पाहिजेत, असे एक दिव्य स्वप्न मनाशी बाळगून उद्योजक श्री सुरेशरावजी साठे कर्नाटकात छत्रिय मराठा परिषदेचे राज्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
सुरेशरावजी साठे यांचा जन्म बंगळूर येथे दिवंगत व्ही.ए.सुब्बाराव साठे व मंजुळाबाई यांच्या पोटी झाला. ते स्वत: मॅकॅनिकल इंजिनियर असून राज्यातील प्रतिथयश उद्योजक आहेत. स्वत:ची ऐशोआरामाची जिंदगी असतांनाही राज्यातील मराठा समाज स्थिरस्थावर झाला पाहिजे, या उद्देशाने त्यांनी त्यांच्या कार्याला सुरूवात केली. २०१५ साली त्यांची क्षत्रिय मराठा परिषदेच्या राज्याध्यक्षपदी निवड झाली. मराठा समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी अनेक योजना आखल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजासाठी जमिनी खरेदी केल्या आहेत. त्यांचा जनसंपर्कदेखील जेवढा दांडगा तेवढाच त्यांचा देशभरातील विविध नेते, उद्योजक आणि इतर क्षेत्रातील जाणकारांशी त्यांचे हितसंबंध आहेत. सालस आणि लढाऊ व्यक्तीमत्व असलेले सुरेशरावजी येत्या काळात मराठा समाजासाठी दीपस्तंभ ठरतील, यात मला अजिबात शंका वाटत नाही.
अनेक वर्षांपासून कर्नाटकात छत्रिय मराठा परिषद कार्यरत आहे. सुरेशरावजींनी या परिषदेचा कार्यभार सांभाळल्यानंतर त्यांनी मराठ्यांचे संघटन याकडे विशेष लक्ष दिल्याचे जाणवते. खानापूर तालुका छत्रिय मराठा परिषदेचा अध्यक्ष म्हणून मला त्यांचे हे कार्य जवळून पाहता आले. अनुभवता आले आहे. मराठा समाजातील तरूण-तरूणी हे साठेंजींचे प्रथम लक्ष्य आहे. मराठा समाजातील तरूण-तरूणी स्वयंपर्ण, स्वावलंबी बनले पाहिजेत. यासाठीची त्यांची तळमळ अफाट आहे. त्यातूनच त्यांनी छत्रिय मराठा परिषदेच्या माध्यमातून कर्नाटकातील कुठल्याही कानाकोपऱ्यातील हुशार आणि होतकरू तरूण-तरूणींच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यास सुरूवात केली. आतापर्यंत अशा अनेकांना परिषदेच्यावतीने त्यांनी शिष्यवृत्तीचे वाटप केले आहे. बंगळूरात वास्तव्य करण्यासाठी हॉस्टेलची सोय केली जाते. नोकरी-उद्योगासाठी मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाते. खानापूर तालुक्यावर सुरेशजी साठे यांचा विशेष जीव असल्याने त्यांनी खानापूर तालुक्यातील तरूण-तरूणींना परिषदेच्या योजनांमध्ये प्राधान्यक्रम देण्याचे मान्य केले आहे.
केवळ कर्नाटकातीलच नाही, तर महाराष्ट्रातून येणाऱ्या मराठा समाजातील तरूण-तरूणींनाही त्यांनी मदत करण्यास सुरूवात केली आहे. आपला समाज जगला पाहिजे, टिकला पाहिजे आणि समृध्द झाला पाहिजे, हेच त्यांचे एकमेव ध्येय असल्याने ते समाजासाठी झपाटून कार्यरत असल्याचे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले आहे. मराठ्यांची संस्कृती आणि परंपरा जपण्यातही ते अग्रेसर आहेत. महागोंधळ सारख्या कार्यक्रमाच्या आयोजनात त्यांचा सहभाग त्यांच्या या कृतीची आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही. ते स्वत: उद्योजक आहेत. समाजातील इतरांनीही स्वत:चे उद्योग सुरु करायला हवेत. राज्यातील इतर समाजाप्रमाणेच त्यांनी राज्याच्या विविध भागात आर्थिक सत्ता भक्कम करायला हवी तरच राज्यातील राजकीय सत्ता मराठ्यांच्या जवळ असेल, असे त्यांचे महत्वाकांक्षी धोरण आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज कर्नाटकातील मराठा समाज एकवटत आहे. त्यांनी मराठा समाज संघटनाच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले आहे. समाजात त्यांच्याबद्दल मनस्वी अभिमान असून भविष्यात मराठा समाजाचा उध्दार करण्यासाठी त्यांना बळ मिळो, अशी प्रार्थना त्यांच्या वाढदिनी करतो. त्यांना वाढदिवसानिमित्त कोटी-कोटी शुभेच्छा..!
लोकसभा निवडणूक: डॉ.निंबाळकरांचा प्रचारात धडाका
खानापूर: उत्तर कन्नड लोकसभा मतदार संघात खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी प्रचाराचा धडाका चालविला आहे. त्यांना खानापूर तालुक्याबरोबरच कित्तूर, हल्याळ, कारवार, कुमठा, भटकळ, शिरसी आणि यल्लापूर विधानसभा मतदार संघातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. कारवार आणि शिरसीमधून मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असून यामुळे भाजपच्या नेत्यांना धडकी भरली आहे. खानापूर तालुक्यात प्रचाराची […]