पत्रकार परिषदेत दिली माहिती; लवकरच काँग्रेसवासी होणार
खानापूर: म.ए.समितीचे माजी आमदार एल.बी.बिर्जे गुरूजी यांचे चिरंजीव आणि म.ए.समितीचे माजी कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे यांनी काँग्रेस प्रवेशाचे सुतोवाच्च केले. येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी समितीला सोडचिट्टी देत असल्याचे स्पष्ट केले असून त्यांच्यासमवेत समिती आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. Yashwant Birje and many others says last ‘Jai Maharashtra’ to the M.e.samiti
काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांना पाठिंबा जाहीर करीत तालुक्याच्या विकासासाठी त्यांना विजयी करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. प्रचारसभेत एखाद्या जेष्ठ काँग्रेस नेत्याच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. अलिकडेच यल्लापूरचे भाजप आमदार शिवराम हेब्बार यांचे पुत्र विवेक हेब्बार यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेस प्रवेश केला होता. त्यानंतर काँग्रेस प्रवेशाचे हे लोण खानापूरातही पसरत असून त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांचा ‘हात’ बळकट होत आहे.
पत्रकार परिषदेत बोलतांना यशवंत बिर्जे म्हणाले, काँग्रेसच्या डॉ. अंजली निंबाळकर यांनी आमदार असतांना तालुक्याच्या विकासासंदर्भात वेळोवेळी विधानसभेत आवाज उठविला. कागदपत्रे मराठीतून मिळावीत यासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहेत. त्या खासादर म्हणून देशाच्या संसदेत गेल्यानंतर नक्कीच तालुकावासीयांना न्याय मिळवून देण्यासाठी झटतील, यात शंका नाही. गेल्या कित्येक वर्षे आम्ही समितीसोबत होतो. पण, गेल्या निवडणुकीतील पराभव पाहता, मराठी भाषिक जनता समितीला कंटाळली आहे हे स्पष्टपणे जाणवते. त्यामुळे वेगळी वाट चोखाळत न्याय मिळविण्यासाठी आमची ही धडपड आहे.
डॉ. निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी तालुक्यात स्वयंप्रेरणेने प्रचाराला सुरूवात करीत असल्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी बोलतांना ईश्वर बोबाटे म्हणाले, आतापर्यंत तालुक्याच्या विकासाची दुर्दशा लक्षात घेऊन तालुक्यातील जनतेने डॉ. निंबाकर यांना बहुमताने निवडून देण्याची गरज आहे. मुडेवाडी येथील लुमान्ना अल्लोळकर यांनीही काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन यावेळी केले. प्रसंगी भाजपचे कार्यकर्ते विनायक मुतगेकर, शिंदोळी ग्रा.पं.माजी चेअरमन राजू पाटील यांच्यासह समिती कार्यकर्ते उपस्थित होते.
- समितीला ‘होम पिच’वरच धक्का!
- एकीकडे समितीकडून निरंजन सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात आली असतांना समिती नेते आणि कार्यकर्ते मात्र काँग्रेसच्या वाटेवर आहेत. मराठीशी इमान राखलेले बिर्जे काँग्रेसवासी होत आहेत. त्याशिवाय अन्य कांही भागातूनही कार्यकर्ते काँग्रेस प्रवेश करणार आहेत. त्यामुळे समितीला खिंडार पडणार असून विधान सभेतील लाजिरवाण्या पराभवाची पुनरावृत्ती टाळणे अवघड होणार आहे, अशी चर्चा समिती नेते-कार्यकर्त्यांतच सुरू आहे.
‘कणकुंबी’त पाच लाखांची रोकड जप्त
जांबोटी: बेळगाव-पणजी मार्गावरील कणकुंबी तपासणी नाक्यावर पाच लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. एसएसटी पथकाने ही कारवाई केली. Five lakh cash seized in ‘Kankumbi’ याबाबतची अधिक माहिती अशी, शनिवारी रात्री पणजीहून हैदराबादकडे बस निघाली होती. कणकुंबी नाक्यावर तैनात असलेले एसएसटी अधिकारी मलगौडा पाटील व पोलिस कर्मचाऱ्यांनी सदर बसची तपासणी केली असता सिध्दभट साईभास्कर रेड्डी (रा. […]