कारवार: म.ए.समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांनी आज सोमवारी (ता.१५) त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. यापूर्वी शुक्रवारी भाजपचे विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी त्यांचा अर्ज दाखल केला होता. उद्या मंगळवारी काँग्रेसच्या डॉ. अंजली निंबाळकर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. Niranjan Sardesai’s nomination form of M.E.Samiti filed.
समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांनी आज सकाळी त्यांचा उमेदवारी अर्ज कारवार जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केला. यावेळी अध्यक्ष गोपाळ देसाई, समिती नेते गोपाळ पाटील, बाळासाहेब शेलार, रमेश धबाले उपस्थित होते. उमेदवार निरंजन सरदेसाई यांनी अर्ज दाखल करतांना भगवा फेटा परिधान केला होता, त्यामुळे ते उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. अर्ज दाखल केल्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देण्यात आल्या.
भाजपचा गड; काँग्रेसला नाही अवघड!
विशेष / चेतन लक्केबैलकर मागील ३० वर्षांचा अखंडकाळ वगळता उत्तर कन्नड (कारवार) लोकसभा मतदार संघावर काँग्रेसचा प्रभाव राहिला आहे. हा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आता पुन्हा हा गड राखण्याची संधी काँग्रेसकडे आहे. डॉ. अंजली निंबाळकर यांनी त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा चालविली असल्याने त्यांना यशाची खात्री वाटते. तर भाजपने विश्वेश्वर हेगडे – कागेरी यांना उमेदवारी दिल्याने […]