खानापूर: आज गुरूवारी (ता.१८) काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर या जांबोटी- कणकुंबी भागात प्रचार दौरा करणार आहेत. त्यांनी नागरीकांच्या भेटी घेण्यावर भर दिला असून या भागातील प्रत्येक गावात जाऊन त्या मतदानासाठी आवाहन करणार आहेत. जांबोटी-कणकुंबी भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचार दौऱ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चिगुळे, कणकु्बी, पारवाड, चिखले, आमटे, कालमणी, जांबोटी, हबनहट्टी, – देवाचीहट्टी, तोराळी, गोल्याळी, बेटगिरी, बैलूर, उचवडे, तिर्थकुंडे आदी गावात प्रचार केला जाणार आहे. नागरीकांच्या भेटी तसेच कोपरा सभांचे आयोजन या प्रचार दौऱ्यात करण्यात आले आहे. कारवार हा मोठा लोकसभा मतदार संघ आहे. त्यातच प्रचाराचा कालावधी कमी असल्याने सध्या सभांऐवजी मतदारांच्या भेटी घेतल्या जात आहेत, अशी माहिती ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी यांनी दिली.

लोकसभा निवडणूक: डॉ. अंजली निंबाळकरांसाठी स्त्रीशक्ती एकवटली
गर्लगुंजी, इदलहोंड, निट्टूर आणि हलकर्णी परिसरात महिलांचा गराडा खानापूर: काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी बुधवारी (ता.१७) गर्लगुंजी, इदलहोंड, निट्टूर आणि हलकर्णी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील गावांना भेटी दिल्या. यावेळी प्रत्येक गावातील महिलांनी त्यांना स्वयंस्फुर्तीने गराडा घालत पाठिंबा जाहीर केला. आमचं ठरलंय, यावेळी केवळ ताईच! असा वज्रनिर्धार महिलांनी व्यक्त केला. प्रत्येक गावात कोपरा सभा घेण्यात आल्या, […]