गर्लगुंजी, इदलहोंड, निट्टूर आणि हलकर्णी परिसरात महिलांचा गराडा
खानापूर: काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी बुधवारी (ता.१७) गर्लगुंजी, इदलहोंड, निट्टूर आणि हलकर्णी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील गावांना भेटी दिल्या. यावेळी प्रत्येक गावातील महिलांनी त्यांना स्वयंस्फुर्तीने गराडा घालत पाठिंबा जाहीर केला. आमचं ठरलंय, यावेळी केवळ ताईच! असा वज्रनिर्धार महिलांनी व्यक्त केला. प्रत्येक गावात कोपरा सभा घेण्यात आल्या, यावेळी गोरगरिब जनतेचा विकास केवळ काँग्रेसच करू शकते, त्यासाठी यावेळी मला संसदेत पाठवून तालुक्याने भोगलेला ३० वर्षांचा वनवास संपवावा, असे आवाहन डॉ. निंबाळकर यांनी केले.
डॉ. निंबाळकर यांनी गर्लगुंजी, इदलहोंड, निट्टूर आणि हलकर्णी परीसरातील गावांमध्ये जाऊन प्रचार केला. शेतात जाऊन त्यांनी महिलांच्या भेटी घेतल्या. यावेळी महिलांनी त्यांच्याकडे समस्यांचा पाढा मांडला. केवळ काँग्रेसच आमच्या समस्या सोडवू शकते. त्यामुळे यावेळी डॉ. निंबाळकर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करू, असा निर्धार महिलांनी व्यक्त केला. प्रत्येक गावात महिलांनी स्वयंस्फुर्तीने डॉ. अंजली निंबाळकर यांची भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला.
हलकर्णी येथील कोपरा सभेत बोलतांना डॉ. निंबाळकर म्हणाल्या, आतापर्यंत भाजपने सर्वसामान्यांची केवळ दिशाभूल केली आहे. समाजात द्वेष पसरविणे, श्रीमंतांची कर्जे माफ करून त्यांना आणखी श्रीमंत करणे, खाणार नाही, खाऊ देणार नाही असे सांगत कोट्यवधींचा इलेक्ट्रॉल बाँड घोटाळा केला आहे. भाजपचे सरकार सर्वसामान्यांचे नाही, ते भांडवलदारांचे सरकार आहे. महागाईने जनता पोळून निघाली असतांना मोदींना केवळ त्यांच्या उद्योजक मित्रांचे भले करायचे आहे. अशा या सरकारला वेळीच जागा दाखवून दिली पाहिजे.
यावेळी बोलतांना ॲड. ईश्वर घाडी यांनी भाजपवर शरसंधान साधले. ते म्हणाले, भाजप हा पक्ष मुळातच सर्वसामान्यांचा नाही. केवळ मते मिळविण्यासाठी खोटी अश्वासने देऊन जनतेला फसविले जात आहे. २०१४ साली मोदींनी शेतकऱ्यांच्या शेती मालाला हमीभाव देण्याची घोषणा केली होती. हमीभाव तर मिळाला नाहीच, पण शेतकरी विरोधी कायदे करून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारे भाजपचे सरकार उलथवून टाकायचे असेल तर काँग्रेसचे हात बळकट करण्याची गरज आहे. डॉ. अंजली निंबाळकर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी जनतेनेच पुढाकार घ्यावा.
यावेळी प्रचाराला सर्वच ठिकाणी प्रचंड प्रतिसाद लाभला. डॉ. निंबाळकर यांनी महिलांशी संवाद साधतांना तुम्ही मांडलेल्या समस्या सोडविण्यासाठी यावेळी भाजपला हद्दपार करून काँग्रेसला विजयी करा, असे आवाहन केले. प्रसंगी विनायक मुतगेकर, सुरेश दंडगल, अनिता दंडगल, महेश चौगुले, गुंडू कोडला, जोतिबा गुरव, प्रमोद सुतार, प्रसाद पाटील, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष महादेव कोळी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
आम्हाला भाजपचा उमेदवारच माहीत नाही!
आम्हाला काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर सोडून दुसरा उमेदवारच माहीत नाही. आमच्या तालुक्यातील आमच्या हक्काच्या उमेदवार असतांना आम्ही दुसऱ्यांना मत देण्याचे पाप करणार नाही, असे मत एका महिलेने प्रचारावेळी व्यक्त केले. यावेळी तेथे उपस्थित महिलांनी ‘ताई तुम्ही काळजी करू नका, आम्हाला भाजपचा उमेदवार कोण हे सुध्दा माहीत नाही. आम्हाला फक्त तुमचीच ओळख आहे. आणि आम्ही ओळखीच्याच व्यक्तीला मत देणार, असे म्हणताच डॉ. निंबाळकरदेखील भारावून गेल्या.
प्रमोद कोचेरी साहेब, हेगडेंचे ‘टॉवर’ कुठे लागले?
‘त्या’ तेरा गावातील लोकांचा सवाल; भाजपचा ‘बाजार’ उठणार: लक्ष्मण कसर्लेकर खानापूर: खोटं बोला; पण रेटून बोला, ही भाजपची गल्ली ते दिल्लीपर्यंत रणनीती राहिली आहे. त्यात खानापूरचे नेतेदेखील मागे नाहीत. भाजपचे नेते प्रमोद कोचेरींनी याबाबतीत पहिला क्रमांक पटकावला आहे. दीडड वर्षांपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेेऊन तालुक्याच्या पश्चिम घाटातील १३ गावांत मोबाईल टॉवर उभे करण्यात येणार असल्याची […]