ॲड.ईश्वर घाडी; कणकुंबीत डॉ. अंजली निंबळकरांचे जंगी स्वागत
जांबोटी: तालुक्याचा पश्चिम भाग हा जंगलाने व्यापलेला आहे. येथील समस्या सोडविण्यासाठी दिल्ली दरबारी प्रयत्न व्हायला हवेत. परंतु, गेल्या ३० वर्षात भाजपच्या खासदारांनी केवळ खुर्ची गरम केली. ते पाच वर्षातून एकदा केवळ मते मागायला येत होते. त्यामुळे हा भाग दुर्गम राहिला आहे. यावेळेला आपल्या तालुक्यातील डॉ. अंजलीताईंना काँग्रेसने तिकीट दिले आहे. त्याच तुमच्या समस्या मार्गी लावती. त्यासाठी त्यांना प्रचंड बहुमतांनी निवडून देणे ही तुमची जबाबदारी आहे, असे मत ब्लॉक काँग्रेसचे माजी अध्यक्ष ॲड.ईश्वर घाडी यांनी मांडले.
आज गुरूवारी (ता. १८) कणकुंबी येथे डॉ. निंबाळकर यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली. यावेळी कणकुंबीवासीयांनी त्यांचे जंगी स्वागत केले. त्यांनी सुरूवातीला माऊलीदेवीचे दशर्न घेतले. त्यानंतर नागरीकांशी संवाद साधला. सभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. महिलांनी पंचारती ओवाळून डॉ. निंबाळकर यांचे औक्षण केले. तसेच अरूण नाईक यांनी गावच्यावतीने पाठिंबा जाहीर करीत डॉ. निंबाळकर यांना विजयी करून संसदेत पाठविण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी बोलतांना डॉ. निंबाळकर म्हणाल्या, गेल्या १५ वर्षांपासून मी खानापूर तालुका पिंजून काढला आहे. येथील समस्यांची जाणीव मला आहे. आमदारकीच्या काळात अनेक समस्या मार्गी लावल्या आहेत. कांही समस्या राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नव्हत्या, त्या खासदार झाल्यानंतर तात्काळ मार्गी लावणार आहे. भाजपने ३० वर्षे केवळ तुमची मते लुटली आणि स्वत:ची घरे भरली आहेत. आता बस्स झाले, ही जुमलेबाजी आणि खोटारडेपणा खपवून घेऊ नका. काँग्रेसला संधी द्या.
काँग्रेसने महिलांसाठी ज्या योजना लागू केल्या आहेत, त्या योजनांमुळे प्रत्येकी वर्षाला स्त्रीयांच्या बँक खात्यात २४ हजार रुपये जमा होत आहेत. बस प्रवास मोफत आहे, वीज बिल माफ केले गेले आहे. त्यामुळे या भागातील गोरगरिब जनतेला दिलासा मिळाला आहे. काँग्रेसशिवाय पर्याय नाही. भाजपला हद्दपार करा आणि काँग्रेसला विजयी करून विकासाची गंगा मलप्रभेसारखी वाहती ठेवा, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले. यावेळी कणकुंबी येथील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. अंजली निंबाळकर यांना चिगुळेत एकमुखी पाठिंबा
चिगुळेत घरोघरी प्रचार; मतदारांशी साधला संवाद जांबोटी: काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी गुरूवारी (ता.१८) चिगुळे येथे घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या. त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचे अश्वासन डॉ. निंबाळकर यांनी दिले. यावेळी गावकऱ्यांनी त्यांना एकमुखी पाठिंबा जाहीर केला. पश्चिम भागातील सर्वच गावांनी भाजपला यापूर्वी भरघोस मतदान केले. प्रचाराची सुरूवात भाजपने चिगुळेतून केली. […]