चिगुळेत घरोघरी प्रचार; मतदारांशी साधला संवाद
जांबोटी: काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी गुरूवारी (ता.१८) चिगुळे येथे घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या. त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचे अश्वासन डॉ. निंबाळकर यांनी दिले. यावेळी गावकऱ्यांनी त्यांना एकमुखी पाठिंबा जाहीर केला.
पश्चिम भागातील सर्वच गावांनी भाजपला यापूर्वी भरघोस मतदान केले. प्रचाराची सुरूवात भाजपने चिगुळेतून केली. मात्र चिगुळेच्या विकासाचा विचार कधीच केला नाही. भाजपचा खोटारडेपणा उघडा पडला आहे. केवळ खोटी अश्वासने देऊन जनतेची फसवणूक करण्याचे काम भाजपच्या खासदार, आमदार आणि नेत्यांनी चालविले आहे. त्यामुळे यावेळी तालुक्यातील जनतेने भाजपला तालुक्यातून कायमचे हद्दपार करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. काँग्रेसच्या हाताला साथ देण्यासाठी जनता सज्ज झाली असल्याने विजय निश्चित आहे, असा विश्वास उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी व्यक्त केला.
गावात प्रवेश करताच महिलांनी डॉ. निंबाळकर यांना गराडा घालून त्यांचे उत्स्फूर्दपणे स्वागत केले. गावातून प्रचारफेरी काढल्यानंतर एका घरात सभा घेण्यात आली. यावेळी गावकऱ्यांनी त्यांच्या समस्यांचा पाढा डॉ. निंबाळकर यांच्यासमोर वाचला. कोणीच नेते आमच्या समस्यांची दखल घेत नाही. तुम्ही आमदार असतांना बऱ्याच समस्या सोडविल्या आहात. यापुढील काळातही गाव तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही दिली. एकंदर, चिगुळे गावाने एकमुखी पाठिंबा जाहीर करून डॉ. निंबाळकर यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला आहे.
कारवार लोकसभा: खानापुरातून चौघांचे उमेदवारी अर्ज
कारवार: उत्तर कन्नड लोकसभा मतदार संघासाठी खानापूर तालुक्यातून चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. एकुण १७ उमेदवारांनी २९ अर्ज दाखल केले आहेत. उद्या शनिवारी (ता.२०) अर्जांची छाणणी होणार आहे. तर २२ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे यातील किती जण रिंगणात राहणार याबद्दलचे चित्र सोमवारी (ता.२२) स्पष्ट होईल, अशी माहिती […]