समांतर क्रांती विशेष
ज्यांनी महाराष्ट्र धर्म वाढावा, यासाठी जीवाची बाजी लावली, त्या शहाजी राजेंची समाधी कर्नाटकाच्या कुशीत आहे. त्यांच्यासमवेत कर्नाटकात आलेले तत्कालीन मराठे कर्नाटकातच राहिले. महाराष्ट्र, मध्यप्रदेशसह विविध राज्यात मराठा समाज मोठ्या संख्येने आहे. पण, इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटकात जेवढा अन्याय मराठा समाजावर झाला आहे, तेवढा क्वचीतच अन्य समाजावर झाला आहे. भाजपने तर कळसच केला आहे. अलिकडची उदाहरणे घ्यायची झाली त उत्तर कन्नड मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांच्याबद्दल कारवारमधील भाजप नेत्यांने अपशब्द वापरला होता. भाजपचे राज्याध्यक्ष बी.एस.विजयेंद्र यांनी आमदार संतोष लाड यांना थेट ‘नालायक’ म्हणण्यापर्यंत मजल मारली.
आता याच भाजपने बिदरमधील पाच मराठा नेत्यांची पक्षातून हाकलपट्टी केली आहे. बंडखोर उमेदवार म्हणून डॉ. दिनकर मोरे यांनी बिदरमधून अर्ज दाखल केला. त्यांचा अर्ज दाखल करतांना त्यांच्यासमवेत त्यांचे समर्थक नेते जयराज बुक्का, रावसाहेब बिरादार, जनार्दन बिरादार, शरनाप्पा गंची आदी उपस्थित होते. त्या सर्वांवर भाजपने कारवाई केली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ पाटील यांनी ही कारवाई केली आहे. यापूर्वी कुरबर समाजातील जेष्ठ नेते आणि माजी मंत्री के.एस.ईश्वरप्पा यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. भाजपच्या या जातीयवादी भूमीकेचे खंडन सर्वच स्थरातून होत आहे.संतोष लाड यांना नालायक संबोधल्याने संतप्त झालेल्या हुबळीतील मराठा समाजाने रस्त्यावर उतरून जोरदार धरणे आंदोलन करून भाजपचा निषेध नोंदवला आहे. मराठा समाजाचा बालेकिल्ला असलेल्या खानापूर तालुक्यातील मराठे भाजपची लाचारी सोडून निषेध करण्याचे धाडस कधी दाखवणार? असा प्रश्न विचारला जात असून यावेळी तरी भाजपचे लाचार नेते-कार्यकर्ते योग्य भूमीका घेणार का?
भाजप हा मुळातच शेटजी-भटजींचा पक्ष असल्याने इतर समाजातील नेत्यांचा वापर केवळ सत्ता आणि मत्ता मिळविण्यासाठीच केला जातो, गेल्या कांही दिवसातील घटनावरून स्पष्ट झाले आहे. यावेळी भाजपने राज्यातील सर्वच मराठा नेत्यांना ‘टार्गेट’ केले असल्याने या अवमानाचा बदला घेत भाजपला जोर का झटका और जोरसे देण्याची वेळ आली आहे. उत्तर कन्नड मतदार संघात मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे. या समाजाने एकत्र येऊन भाजपच्या उमेदवाराला धूळ चारली पाहिजे. भाजपमध्ये राहून जातीच्या राजकारणाचे बळी ठरलेल्यांनीदेखील यावेळी जातीसाठी माती खाण्यास हरकत नाही. छ.शिवरायांच्या नावाने मते मागणाऱ्या भाजपला सणसणीत उत्तर देण्याची ही खरी वेळ आहे. याशिवाय केवळ जात बघून टीका करणे किंवा अपमानास्पद कारवाई करणे, या भाजपच्या प्रवृत्तीला शहाजी महाराजांच्या या भूमीत जशास तसे उत्तर देत छत्रीय मराठा समाज संघटनेने तात्काळ मराठा समाजाच्यावतीने भाजपवर बहिष्कार घालण्याचा आदेश जारी करावा. स्थानिक मराठा उमेदवारांना मतदान करून भाजपला धडा शिकवावा, असे मराठा समाजातील धुरीणांचे मत आहे. सर्वसामान्य मराठा माणसानेदेखील स्वाभिमान जीवंत ठेवत यावेळी भाजपला चले जाव म्हटले पाहिजे.
2 thoughts on “मराठ्यांनो, आता तरी शहाणे व्हा!”