खानापूर: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुरूवारी (ता. ०२) भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ खानापुरात सभा होणार आहेत. समिती त्यांना रोखणार का? त्यांच्या निषेधार्थ काळे झेंडे दाखवणार का? असा प्रश्न मराठी भाषिकांतून विचारला जात आहे.
पहिल्यांदाच उत्तर कन्नड लोकसभा मतदार संघातून खानापूर म.ए.समितीचे उमेदवार रिंगणात आहेत. ‘केवळ मराठीच्या अस्तित्वासाठी’ अशी यावेळची समितीची ‘टॅगलाईन’ आहे. यापूर्वी कधीही महाराष्ट्रातील नेते समिती उमेदवाराच्या विरोधात राष्ट्रीय पक्षांचा प्रचार करण्यासाठी आले नव्हते. कुणीच मुख्यमंत्र्यांनी ते धाडस केले नसतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र हे धाडस दाखविल्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त होत आहे. # Maharastra CM Eknath Shinde
यापूर्वी दोन वेळा महाराष्ट्रील नेत्यांनी समितीविरोधी प्रचाराचा प्रयत्न केला होता. त्या-त्या वेळी समितीने त्यांचा निषेध करीत काळे झेंडे दाखविले होते. सभा उधळून लावण्यात आल्या होत्या. मुख्यंमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्र सीमावासीयांच्या पाठिशी असल्याची ग्वाही दिली होती. आता तेच समिती उमेदवाराच्या विरोधात प्रचारसभा घेणार असल्याने आश्चर्यजनक संताप व्यक्त होत आहे.
सदर सभा गुरूवारी (ता. २) दुपारी मलप्रभा क्रीडांगणावर होणार असल्याचे भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात आले आहे. समितीच्या भूमीकेकडे मराठी भाषिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
दहा वर्षांची ‘हिटलरशाही’ उलथवून टाका
सिध्दापूर तालुक्यात डॉ. निंबाळकर यांचा प्रचार दौरा सिध्दापूर: विकासाकडे दुर्लक्ष करून केवळ विरोधकांवर तोंडसूख घेण्यात भाजपच्या नेत्यांना स्वारस्य आहे. त्यांना सर्व सामान्य जनतेच्या समस्यंशी कांही देणे-घेणे नाही. गेल्या दहा वर्षांपासून देशातील जनता ‘हिटलरशाही’ राजवट असल्याचा अनुभव घेत आहे. दहा वर्षांचा हा वनवास संपविण्यासाठी यावेळी जनतेने भाजपची गच्छंती निश्चित केली आहे, असा विश्वास काँग्रेसच्या उमेदवार डॉ. […]