सिध्दापूर तालुक्यात डॉ. निंबाळकर यांचा प्रचार दौरा
सिध्दापूर: विकासाकडे दुर्लक्ष करून केवळ विरोधकांवर तोंडसूख घेण्यात भाजपच्या नेत्यांना स्वारस्य आहे. त्यांना सर्व सामान्य जनतेच्या समस्यंशी कांही देणे-घेणे नाही. गेल्या दहा वर्षांपासून देशातील जनता ‘हिटलरशाही’ राजवट असल्याचा अनुभव घेत आहे. दहा वर्षांचा हा वनवास संपविण्यासाठी यावेळी जनतेने भाजपची गच्छंती निश्चित केली आहे, असा विश्वास काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी सिध्दापूर तालुक्यातील बिळगीतील सभेत व्यक्त केला.
या सभेला राज्य प्रशासकीय आयोगाचे अध्यक्ष आर.व्ही.देशपांडे, केपीसीसी प्रचार समिती अध्यक्ष विनयकुमार सोरके, आमदार भिमान्ना नायक, जिल्हाध्यक्ष साई गावकर, सिध्दापूर ब्लॉकचे अध्यक्ष वसंत नायक, प्रचार समिती अध्यक्ष वेंकटेश हेगडे-होसबाळे, हमी प्राधिकारणाचे अध्यक्ष के.जी.नागराज, युवा काँग्रेस अध्यक्ष प्रशांत नायक यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
डॉ. निंबाळकर पुढे बोलतांना म्हणाल्या, पंतप्रधान मोदी मंगळसुत्राबद्दल विधान करीत फिरत आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी जो त्याग केला आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी जे सहन केले आहे. त्याची कल्पना त्यांना नाही. काँग्रेसच मंगळसुत्राची खरी किंमत जाणते. भाजपवाल्यांना त्याचे महत्व माहीत नाही. काँग्रेसच्या प्रत्येक पंतप्रधानांनी देशाच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले, पण त्याचे कुठेही भांडवल केले नाही. त्याउलट मोदी हे राम मंदिर आणि शहिदांचे भांडवल करीत आहेत. त्यांच्याकडे सांगण्यासारखा विकासाचा मुद्दाच शिल्लक राहिलेला नाही.
यावेळी बोलतांना आ.आर.व्ही.देशपांडे म्हणाले, मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून अतिक्रमीत जमिनी स्थानिक जनतेला कायमस्वरूपी देण्याची विनंती केली होती. पण, पंतप्रधान मोदींनी त्या पत्राला प्रतिसाद दिला नाही. भाजपचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका. डॉ. अंजली निंबाळकर यांना प्रचंड बहुमतांने विजयी करा, केंद्रात आमचेच सरकार असेल. तेव्हा सर्व समस्यांचे निरसन नक्कीच करू.
सिध्दापूर तालुक्यातील बिळगी, होसूर, हरसीकट्टा येथे झालेल्या प्रचार सभांना प्रचंड जमाव होता. त्यात महिलांची संख्या लक्षणीय आणि विरोधकांना धडकी भरविणारी होती. उपस्थितीतांनी डॉ. निंबाळकर यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचा वज्रनिर्धार यावेळी व्यक्त केला.
मराठा समाजाचा एकमुखी पाठिंबा; विरोधक हडबडले
कुणबी समाजाच्या समस्या संसदेत मांडणार: डॉ. अंजली निंबाळकर खानापूर ब्यूरो न्यूज उत्तर कन्नड लोकसभा मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांना मराठा समाजाने एकमुखी पाठिंबा जाहीर केला आहे. संघटनेचे युवा नेते रोहीत साठे यांच्या उपस्थित झालेल्या पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर करण्यात आला. यामुळे विरोधक भाजपचे नेते चांगलेच हडबडले आहेत. कारण, उत्तर कन्नड मतदार […]