खानापूर: दुचाकीला ट्रकने मागून धडक दिल्याने घडलेल्या अपघातात शिवठाण येथील तरूण ठार झाला तर त्याचा मित्र जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना खानापूर-जांबोटी मार्गावर बाचोळी फाट्यानजीक दुपारी १२ च्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, शिवठाण येथील तरून विधेश तुकाराम मिराशी (वय २५) व त्याचा मित्र दुचाकीवरून मित्राच्या लग्नाला जात होते. दरम्यान, बाचोळी फाट्यानजीक त्यांच्या दुचाकीला मागून ट्रकने जोराची धडक दिली. त्यात विधेश हा गंभीर जखमी झाला. त्याला इस्पितळात दाखल करण्यासाठी गेऊन जाताना त्याचा मृत्यू झाला. त्याच्या जखमी मित्रावर उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर चालकाने ट्रकसह पळ काढला आहे. दुचाकी रस्त्याच्या विरूध्द दिशेला पडली होती, त्यामुळे अपघात कसा घडला याबाबत पोलिस तपास करीत आहेत. तसेच ट्रकचा शोध घेतला जात आहे. खानापूर पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.
आम्ही केलं, तेच तुम्हीही करा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
खानापूर: आम्ही जे केलं, तेच तुम्हीही करा, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकात ‘ऑपरेशन लोटस’चे आवाहन भाजपला केले. उत्तर कन्नड लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे- कागेरी यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. खानापुरातील मलप्रभा मैदानावर झालेल्या या सभेला ते तब्बल चार तास उशिरा पोहचले. त्यातही रटाळ भाषणामुळे उपस्थित कंटाळले होते. देशात पुन्हा […]