यशवंत बिर्जेंचे हडलग्यात आवाहन; डॉ. निंबाळकरांना पाठिंबा
नंदगड: स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षाच्या वळचणीला गेलेले भाजपचे नेते बरळत आहेत, खोटीनाटी आमिषे दाखवत आहेत. त्यांच्या भूलतापांना बळी पडू नका. भाजपच्या केंद्रातील सरकारने गोरगरीब जनतेला भिकेला लावले. पण, कर्नाटकातील काँग्रेस सरकारने गोरगरीब जनतेला सावरले आहे. महिलांना प्रतिमहा दोन हजार रुपये दिले जात आहेत, बसप्रवास मोफत झाला आहे. वीजबिलात सवलत दिली आहे. तरूण-तरूणींसाठी योजना सुरू केली आहे, केवळ काँग्रेस सरकारच हे करू शकते, त्यासाठी खोटारड्या भाजपच्या नादाला न लागता डॉ. अंजली निंबाळकर यांना बहुमतांने विजयी करा, असे आवाहन यशवंत बिर्जे यांनी केले.
हडलगा येथे प्रचारफेरी आणि कोपरासभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. गावात घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला. प्रसंगी बोलतांना ईश्वर बोबाटे (मणतुर्गा) यांनी काँग्रेस हा पक्ष सर्वसामान्यांचा पक्ष आहे. भाजपने गेल्या दहा वर्षात सामान्य जनतेसाठी काहीच केले नाही. एकीकडे शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार द्यायचे आणि दुसरीकडे खतांचे दर भरसाठ वाढवायचे. पिकांना हमीभाव दिला नाही. महागाई वाढली आहे. नोकऱ्या नाहीत. त्यामुळे जनता मेाकुटीस आली आहे. खेड्यापाड्यातील जनतेनेच हे थापाड्यांचे सरकार तडिपार केले पाहीजे. काँग्रेसला संधी देण्यासाठी डॉ. निंबाळकर यांना तालुक्यातून प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार करूया, असे प्रतिपादन केले.
यावेळी राजू पाटील, म्हात्रू धबाले यांच्यासह हडलगा येथील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. निंबाळकर यांच्या प्रचारार्थ नंदगड परिसरातील गावात घरोघरी जाऊन मतयाचना करण्यात आली. हडलगा ग्रामस्थांनी डॉ. निंबाळकर यांना पाठिंबा जाहीर करीत बहुमतांने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
मोदी थापाड्यांचे सरदार, तर भाजप थापाड्यांचा कारखाना
मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचा घाणाघात; मुंदगोडमधील प्रचार सभेला तोबा गर्दी मुंदगोड: नोकरी देण्याची मागणी करणाऱ्या तरूणांना पकोडे तळण्याचा आणि विकण्याचा सल्ला पंतप्रधान मोदी देतात. मोदी-मोदी ओरडणाऱ्या तरूणांना त्यांनी वाऱ्यावर सोडले आहे. नरेंद्र मोदी हे थापाड्यांचे सरदार तर भाजप हा थापाड्यांचा कारखाना आहे, असा घणाघात मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी मुंदगोड येथे डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत […]