खानापूर: कोरोना महामारीच्या काळात जनतेला किट पोहचविले नसल्याचा आरोप करीत या प्रकाराला माजी आमदारांना जबाबदार धरून भाजपच्या नेत्यांनी चुकीची माहिती पसरविण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यासंदर्भात इंटरसेलच्या अध्यक्षा लक्ष्मी पाटील यांनी खुलासा करतांना हा आरोप बिनबुडाचा आणि जाणीवपूर्वक केला जात असून भाजपच्या ‘त्या’ नेत्यांवर कारवाई झाली पाहीजे, असे मत व्यक्त केले आहे.
कोरोना महामारीच्या काळात भाजपच्या सरकारकडे आम्ही २० हजार किटची मागणी केली होती. पण, केवळ दहा हजार किट उपलब्ध झाले. त्यांचे वितरण झाले, मात्र उर्वरीत लाभार्थींना काय देणार हा आमच्यासमोरील प्रश्न होता. आता भाजपच्या कांही नेत्यांनी याचे राजकीय भांडवल करीत तत्कालीन आमदारांना यात नाहक गोवण्याचा बालिश प्रयत्न चालविला आहे. त्यासाठी सरकारकडून पुरवण्यात आलेल्या किटचा फोटो वापरून बातम्या पेरल्या जात आहेत.
हा एकंदर प्रकार पाहता ही जाणीवपूर्वक मोहीम राबवून बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचे जाणवते. संबंधीतांवर कठोर कारवाई व्हायला हवी, असे सौ. पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या व्हीडीओत म्हटले आहे.
आमचा संयम पाहू नका..
येत्या दोन महिन्यात भाजपच्या नेत्यांना तोंड लपवायलाही जागा राहणार नाही. तुम्ही खोट्या अफवा पसरवून आमच्यावर आरोप करीत असाल तर आम्ही तुमच्या खऱ्याखुऱ्या घोटाळ्यांची जंत्रीच बाहेर काढू, असा इशारा ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी यांनी दिला आहे.
‘समांतर क्रांती’शी बोलतांना ते म्हणाले, नंदगड मार्केटिंग सोसायटीत झालेला भ्रष्टाचार काय कमी आहे का? सर्वसामान्यांचा तांदूळ विकून खाला जातो. बारदान, सिलेंडरमध्येही प्रचंड घोटाळा आहे. त्याचा हिशेब तालुक्यातील जनता या संस्थेकडे मागणार आहेच. सर्वसामान्यांच्या ठेवींचा हिशोबदेखील भाजपच्या नेत्यांना द्यावा लागेल,असे श्री. कोळी म्हणाले.
ज्यांनी तालुका लुबाडला त्यांनी दुसऱ्यांकडे बोट करतांना कमीत कमी जनाची नाही तरी मनाची तरी लाज बाळगावी. तालुक्यात भाजपच्या नेत्यांनी सध्या केवळ ‘दादागिरी’ चालविली आहे. पण, निवडणुकीनंतर त्यांचा बंदोबस्त तालुक्यातील जनता नक्कीच करेल, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आम्ही संयमाने वागतोय, याचा अर्थ आम्ही दुबळे आहोत असे नाही. कारण, आम्हाला छ. शिवाजी महाराजांची संस्कृती आहे. आम्ही बाजपच्या नेत्यांसारखे सडकछाप आणि खोटे आरोप करणारे नाही. योग्य वेळी योग्य उत्तर देऊ, असा इशारा यावेळी महादेव घाडी यांनी दिला आहे. एकंदर, उद्या मंगळवारी (ता. ०७) रोजी मतदान असतांना तालुक्यात आरोप‘वॉर’ सुरू आहे.
भाजपपेक्षा काँग्रेसच बरी.. पण का?
माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी पुन्हा एकदा रामदूर्ग येथे लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील सरकार बदलणार असल्याची वल्गना केली आहे. गेल्या कांही दिवसांपासून सरकार बदलण्यासंदर्भात भाजपने आघाडी घेतली असली तरी त्याचा विपरीत परिणाम भाजपवरच होत असल्याचे सामान्य कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. सरकार बदलल्यास काँग्रेस महिलांना महिना दोन हजार देत असलेली योजना बंद होणार आहे. मोफत बस प्रवासही बंद […]