संवाद / चेतन लक्केबैलकर
- मतदानाला सुरूवात झाली आहे, मला संपूर्ण विश्वास आहे की मतदार संघातील मतदारांनी यावेळी बदल घडवायचाच, ही खूनगाठ बांधली आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे. विकासाचे ढोल पिटले जात असले तरी पायाभूत सुविधा पुरविण्यात आणि गोरगरीबांचे जीवन-मरणाचे प्रश्न सोडविण्यात भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. भाजपच्या अपयशी कारकिर्दीचा अंत व्हावा, ही जनतेचीच इच्छा आहे, असे मत काँग्रेसच्या उत्तर कन्नडमधील उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी समांतर क्रांतीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.
- प्रचाराची रणधुमाळी थांबली आहे, मतदान प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. दरम्यान, तुमच्यावर आरोप करण्यात आले.त्याबद्दल काय सांगाल?
प्रचार म्हटलं की होणारच. पण, भाजपचे नेते ज्या पध्दतीने पातळी सोडून टीका करतात, आरोप करतात. माझ्या मतदार संघात भाजपचा उमेदवार पराभूत होणार हे कळून चुकल्यामुळे भाजपचे नेते बिथरले. त्यमुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ते कांहीही बरळत होते. शेवटी भाजपची हीच संस्कृती आहे. गेल्या दहा वर्षात त्यांना लोकोपयोगी असे कांहीच करता आले नसल्याने त्यांच्याकडे विकासावर बोलण्याची नैतिकता नाही. भाजपचे नेते उथळ आणि मंदबुध्दी असल्याचे प्रदर्शन करण्याची घाई का करतात, याचे मात्र नक्कीच आश्चर्य वाटले.
- सभांमधून भाजप नेते विकासावर बोलत होते. महामार्गांची निर्मिती, महिलांचा आदर, राममंदिर हे त्यांचे प्रचारातील मुद्दे होते.
हो, त्यांचे हे मुद्दे होते. पण, सर्वकांही खोटंच खोटं. एका रात्रीत इतके कि.मी.चा महामार्ग केला, असा दावा ते करीत होते. तर आपला खानापूर-रामनगर महामार्ग गेल्या सहा वर्षांपासून का रखडला आहे. भाजपच्या सरकारने किंवा त्यांच्या खासदारांनी त्यासाठी का प्रयत्न केले नाही? जंगल भागातील रस्ते, पाणी आणि इतर सुविधांसाठी केंद्राची परवानगी लागते, त्यासाठी भाजपने काय केले?
महिलांचा आदर या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिक भाजपने कधीच गमावला आहे. उन्नाव, कथुआ, मनिपूरच्या घटनांबद्दल मोदींचे तोंड उघडत नाही. महिलांबद्दल अपशब्द वापरणारे स्थानिक नेत्यांची नैतिकता तपासून बघा. यावेळी तर मोदींनी चक्क बलात्कारी खासदाराचा प्रचार करून भाजपची लायकी स्पष्ट केली आहे.
राममंदिर हा भारतीय म्हणून सगळ्यांचा अभिमान आहे. भाजपवाले मुह मे राम बगलमें चुरा, असे वागत आले आहेत. ते कधीच जय सीयाराम म्हणणार नाहीत. त्यांना सीतामातेशी देणे-घेणे नाही, ते महिलांचा आदर करू शकतील का? राम मंदिर मोदींनी नाही उभारले. त्यांनी केवळ त्याचे भांडवल केले. अंधभक्तांना याची माहिती नसते, त्यामुळे गफलत होते.
- आपला जाहीरनामा चर्चेत आहे, काय सांगाल.
आमच्या स्थानिक मतदार संघातील जाहीरनाम्यात सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी आहे. शेतकरी, कष्टकरी समाजाला महत्व देण्यात आले आहे. कारवार भागात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, अतिक्रमीत जमिनींचे प्रश्न, मच्छिमारांच्या समस्या, आदीवासी-वननिवासींचे जगणे या संबंधी अभ्यास करून जनतेला काय हवे, यावर गांभिर्याने विचार केला आहे. खासदार झाल्यानंतर या प्रत्येक बाबी संसदेत मांडल्या जातील.
शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत. एकीकडे महामार्ग बांधल्याची टिमकी वाजविणारे भाजपवाले शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, याबद्दल केंद्र सरकारकडे पाठपुरावा करतांना कधी दिसले आहेत का? खतांचे दर आभाळाला पोहचले आहेत. त्याबद्दल ते बोलतात का? त्यांना केवळ जाती-धर्म या विषयात स्वारस्य आहे. काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे, जो सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेऊ शकतो.
- भाजप उमेदवाराबद्दल काय सांगाल.
त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं कांहीच नाही. प्रचारादरम्यान लोक त्यांच्या नेतेगिरीबद्दल बोलत होते. तरूणांची फसवणूक करणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. जाती-धर्मात आग लावण्याव्यतिरीक्त त्यांनी कांही केले नाही, त्यामुळे ते मागच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. आताही तेच होणार.
- तुम्ही आमदार होता, आता पुन्हा तुम्ही लोकसभेची निवडणूक लढवित आहात. तुम्हाला विजयाची खात्री आहे?
भाजपचे दहा वर्षातील अपयश हेच संपूर्ण देशातील काँग्रेसच्या विजयाचे प्रमुख कारण असेल. अगदी हिटलरशाही जनतेने अनुभवली आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या प्रमुख मुद्यांकडे भाजपच्या मोदी सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केले. राम मंदिर, परदेश दौरे, भांडवलदारांचे लांगूनचालन यावर मोदींचा भर राहीला. यात सर्वसामान्य माणूस भरडला गेला. त्याचे परिणाम मोदींना भोगावे लागतील.
स्थानिक पातळीवर माझ्या मतदार संघातील स्थितीही वेगळी नाही. उत्तर कन्नड मतदार संघ मागास आहे. अतिक्रमीत जमिनीचे प्रश्न ही येथील गंभीर समस्या तर आहेच, शिवाय जंगलाने व्यापलेल्या या भागात विकास झालेलाच नाही. त्या मुद्यावरच मी प्रचार केला, जनतेचा जो प्रतिसाद लाभला, त्यावरून माझा विजय निश्चित आहे. फक्त मताधिक्य किती असेल, हेच बघायचे आहे.
उत्तर कन्नडमधून ७६.५२ टक्के मतदान; खानापुरातून किती?
76.52 percent polling from Uttara Kannada. कारवार: उत्तर कन्नड लोकसभा मतदार संघासाठी झालेल्या निवडणुकीत चुरशीने ७६.५२ टक्के मतदान झाले आहे. तर खानापूर तालुक्यातील २ लाख १९ हजार ४४२ मतदारांपैकी १ लाख ६१ हजार ९१३ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. वाढलेली टक्केवारी नेहमीच सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला मारक ठरते, तसे झाल्यास पुन्हा काँग्रेस उत्तर कन्नडचा गड […]