४ लाख ४५ हजार लंपास; धागेदोरे कलकत्यापर्यंत
खानापूर: येथील विमा एजंट शंकर नारायण माळवे (गणेशनगर-खानापूर) यांच्या बँक खात्यातून तब्बल ४ लाख ४५ हजारांची रक्कम लांबविण्यात आली आहे. ऑनलाईन बँकींगद्वारे ही रक्कम लुबाडण्यात आली असून कलकत्यातील एका बँक खात्यात जमा झाली असल्याचे स्पष् झाले आहे. यासंबंधी सीईएन विभागात तक्रार नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.
शंकर माळवे यांचे बेळगावमधील एका बँकेत खाते आहे. ते नेहमी ऑनलाईन बँकीगचा वापर करतात. त्याचा फायदा उठवीत संबंधीत चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून ४.४५ लाखांची रक्कम त्रयस्त खात्यावर पाठवून घेतली. त्यानंतर त्या खात्यातील रक्कम कलकत्यातील दुसऱ्या खात्यात ऑनलाईन बँकींगद्वारे जमा करण्यात आली.
आपल्या खात्यातून रक्कम काढण्यात आल्याचे लक्षात येताच माळवे यांनी बँकेशी संपर्क साधला. यावेळी सदर रक्कम कलकत्यातील बँक खात्यात जमा झाल्याची माहिती उघडड झाली. सीईएनकडे तक्रार करण्यात आल्यानंतर कलकत्यातील बँक खाते गोठविण्यात आले. पण, तोपर्यंत चोरट्यांनी सदर खात्यातील बहुतांश रक्कम काढली होती. सीईएन पथक या प्रकरणाचा तपास करीत आहे.
One thought on “खानापुरातील विमा एजंटला ऑनलाईन गंडा”