किमान काळ्यादिनी तरी दोन्ही समित्या एकीची संधी साधतील, असा तालुकावासीयांचा होरा होता. पण नेत्यांच्या स्वार्थापुढे सीमालढ्याच्या अस्मितेनेही गुडघे टेकल्याचा लाजिरवाणा प्रकार मराठी भाषिकांना पहावयास मिळाला. काळ्यादिनाच्या पूर्वसंध्येला गर्लगुंजी येथील माऊली ग्रूपच्या पुढाकाराने सर्व नेत्यांनी एकीचा निर्धार जाहीर केला होता. त्याप्रमाणे दुपारपर्यंत झालेल्या वाटाघाटीनंतर गोपाळ देसाई यांच्या गटाच्या म्हणण्यानुसार दिगंबर पाटील यांच्या गटाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवित लक्ष्मीमंदिरात जाऊन समेटाचा प्रयत्न केला. पण, गोपाळ देसाई यांच्या गटाच्या नेते-कार्यकर्त्यांचा हेकेखोरपणा पुन्हा चव्हाट्यावर आला.
दिगंबर पाटील यांच्या गटाचे नेते-कायरकर्त्यांनी विनाअट भेटीचे निमंत्रण स्विकारले. पण, त्याची कदर गोपाळ देसाई यांच्या गटाने केली नाही. त्याउलट बेकीची दरी रूदावण्याचाच प्रयत्न त्यांच्या नेत्यांनी केला. कांही कार्यकर्त्यांनी मात्र त्यांच्या या वर्तणुकीचा निषेध नोंदवित दिगंबर पाटील यांच्या पाठीराख्यांसह शिवस्मारकात जाऊन सभेला हजेरी लावली. त्यामुळे गोपाळ देसाई यांच्या गटातील झारीतल्या शुक्राचार्यांचे मनसुबे जवळपास उघड झाले.
One thought on “‘एकी’ची शेपूट पुन्हा बुडाखाली!”