प्रसंगावधान राखल्याने पत्नी बचावली
समांतर क्रांती न्यूज
जांबोटी : कणकुंबी वनपरीक्षेत्रातील माण गावात दोन अस्वलांच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना आज घडली. सखाराम महादेव गावकर (वय 63) असे त्यांचे नाव असून त्यांच्या पत्नी या हल्ल्यातून नशिबाने बचावल्या आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी, सखाराम व त्यांची पत्नी गावापासून जवळच असणाऱ्या त्यांच्या शिवारात कामात व्यस्त होते. अचानक दोन अस्वलांनी त्यांच्यावर हल्ला केला. यात सखाराम हे गंभीर जखमी झाले तर त्यांच्या पत्नीने प्रसंगावधान दाखविल्याने त्या या हल्ल्यातून सुदैवाने बचावल्या. सखाराम यांना बेळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
कणकुंबी वनाधिकाऱ्यांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. हिवाळ्यात अस्वलांचे हल्ले वाढतात, त्यासाठी शेतकऱ्यांनी दक्षता घेण्याचे आवाहन खात्याने केले आहे.
फुगा घशात अडकून विद्यार्थ्याचा मृत्यू
हल्ल्याळ : येथून जवळच असणाऱ्या जोगनकोप्प येथे फुगा फुगविणे विध्यार्थ्याच्या जीवावर बेतले. सातवीत शिकणाऱ्या नवीन बेळगावकर या विध्यार्थ्याचा या घटनेत हाकनाक बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, नवीन हा काल रविवारी त्याच्या घरी फुगा फुगवत होता. यावेळी हवेने भरलेला फुगा त्याच्या घशात अडकला. तो अस्वस्थ झाल्याने कुटुंबियांनी तात्काळ फुगा घशातून […]