खानापूर : बंगालच्या उपसागरात स्थिरवलेल्या फेंगल चक्रीवादळाचा फटका राज्यातील अनेक जिल्ह्याना बसला आहे. ऐन हिवाळ्यात पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने खानापूर तालुक्यातील शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत. चक्क दिवाळीपर्यंत पावसाने तालुक्याला झोडपून काढल्यानंतर आता कुठे भात कापणी आणि मळण्याना जोर आला होता. त्यात आता भेंगल वादळमुळे रविवारपासून ढगाळ वातावरण आहे. सोमवारी तालुक्याच्या काही भागात तूरळक सरी कोसळल्या. आज मंगळवारी पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडवून दिली आहे. भात कापणी आणि मळणी हंगाम जोरात आहे. हत्तीच्या आगमनाने आधीच शेतकरी चिंतेत सापडला असताना पुन्हा अस्मानी संकट ओढवले असून शेतकरी पुरता घायकुतीला आला आहे. हातातोंडाला आलेले पीक एकतर हत्ती फस्त करीत आहेत, त्यात आता पावसाची भर पडल्याने तालुक्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. फेंगल वादळाचा तालुक्यावरही परिणाम जाणवत आहे. आणखी दोन दिवस अशीच स्थिती राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
महामेळाव्याला परवानगी द्या, अन्यथा खळखट्याक नक्की…
कोल्हापुरात शिवसेनेचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन समांतर क्रांती / कोल्हापूर हिवाळी अधिवेशनाला विरोध दर्शविण्यासाठी बेळगावात महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 9 डिसेंबर रोजी होणाऱ्या महामेळाव्याला परवानगीसाठी अर्ज करण्यात आला असला तरी जिल्हा प्रशासन चालढकल करीत आहे. गेल्या पाच – सहा वर्षांचा अनुभव पाहता परवानगी दिली जाणार नाही असे दिसते, तसे झाल्यास कर्नाटकातील वाहने सीमेवर अडवू, असा […]