कोल्हापुरात शिवसेनेचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
समांतर क्रांती / कोल्हापूर
हिवाळी अधिवेशनाला विरोध दर्शविण्यासाठी बेळगावात महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 9 डिसेंबर रोजी होणाऱ्या महामेळाव्याला परवानगीसाठी अर्ज करण्यात आला असला तरी जिल्हा प्रशासन चालढकल करीत आहे. गेल्या पाच – सहा वर्षांचा अनुभव पाहता परवानगी दिली जाणार नाही असे दिसते, तसे झाल्यास कर्नाटकातील वाहने सीमेवर अडवू, असा इशारा शिवसेनेने (उद्धव ठाकरे) दिला आहे.
यासंदर्भात आज मंगळवारी कोल्हापूरचे प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी ,सीमावासियांवरील कर्नाटकी अन्यायाने कळस गाठला आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा हक्क देखील पायदळी तुडवीला जात आहे. अधिवेशन काळात महामेळावा भरविण्यास बेळगाव जिल्हा प्रशासन विरोध करीत आहे. परवानगी नाकारत आहे. परवानगी दिली नाही तर सीमेवर तीव्र आंदोलन छेडले जाईल. कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी वाहने अडवली जातील, असा सज्जड इशारा दिला.
अधिवेशन काळात कर्नाटकातील मंत्री, आमदार आणि अधिकारी कोल्हापुरात महालक्ष्मी दर्शनासाठी येतात. त्यांच्या वाहनाच्या टायरमधील हवा काढून त्यांची कोंडी करू असा इशाराही सेनेने दिला आहे. कुणाही मंत्री – आमदाराला महाराष्ट्रात फिरू देणार नाही असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्यासमवेत सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, विशाल देवकुळे, अनिकेत घोटणे, धनाजी दळवी, युगंधर कांबळे, अतुल परब, प्रवीण पालव, पूनम फडतरे आणि नागेश पोवार आदी उपस्थित होते. प्रभारी जिल्हाधिकारी संजय पवार यांनी निवेदनाचा पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली आहे.
जीन्स पँटच्या खिशात आणखी एक खिसा का असतो?
कुतूहल / समांतर क्रांती जीन्स वापरणे ही फॅशन बनली आहे. 80च्या दशकात जीन्सने भरतीयावर गारुड केले आणि पारंपारिक सुती कपडावर जणू संक्रात ओढवली. जीन्सच्या पॅन्ट अबाल-वृद्धांच्या आवडीची बनली आहे. लहान असो कि मोठे, प्रत्येकाच्या जीन्स पँटच्या उजव्या खिशात आणखी एक लहान खिसा असतोच. ही केवळ फॅशन आहे कि आणखी काय? जीन्सचा वापर रशिया आणि युरोपीय […]