समांतर क्रांती ब्युरो
Devendra Fadnavis is the 21st Chief Minister; Who has held the post of Chief Minister of Maharashtra?
महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून गुरूवारी (५ डिसेंबर) शपतबध्द झाले. यापूर्वी त्यांनी राज्याचे आठरावे मुख्यमंत्री म्हणून ५ वर्षे १२ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. त्यानंतर औटघटकेचे आणि पहाटेचे मुख्यमंत्री होण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर नोंद आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये ते केवळ ३७ तास मुख्यमंत्री राहीले. आता त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून गुरूवारपासून
त्यांचा कार्यकाल सुरू झाला आहे.
आतापर्यंत कुणी-कुणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भुषविले?
- यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (कराड मतदार संघ)
१ मे १९६० ते २० नोव्हेंबर १९६२ (२ वर्षे २०३ दिवस)
- मारोतराव कमन्नावर (सावोली मतदार संघ)
२० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३ (१ वर्ष ४ दिवस)
- बाळासाहेब सावंत (चिपळून मतदार संघ)
२५ नोव्हेंबर १९६३ ते ५ डिसेंबर १९६३ (दहा दिवस)
- वसंतराव नाईक (पुसद मतदार संघ)
५ डिसेंबर १९६३ ते १ मार्च १९६७ आणि १ मार्च १९६७ ते १३ मार्च १९७२ आणि १३ मार्च १९७२ ते २१ फेब्रुवारी १९७५ (११ वर्षे ७८ दिवस)
- शंकरराव चव्हाण (भोकर मतदार संघ)
२१ फेब्रुवारी १९७५ ते १७ मे १९७७ (२ वर्षे ८५ दिवस)
- वसंतराव दादा पाटील
१७ मे १९७७ ते ५ मार्च १९७८ आणि ५ मार्च १९७८ ते १८ जुलै १९७८( १ वर्ष ६२ दिवस)
- शरदचंद्र पवार (बारामती मतदार संघ)
१८ जुलै १९७८ ते १७ फेब्रुवारी १९८० ( १ वर्ष २१४ दिवस)
- अब्दुल रहमान अंतुले (श्रीवर्धन मतदार संघ)
९ जून १९८० ते २१ जानेवारी १९८२ (१ वर्ष २२६ दिवस)
- बाबासाहेब भोसले (नेहरूनगर मतदार संघ)
२१ जानेवारी १९८२ ते २ फेब्रुवारी १९८३ (१ वर्ष १२ दिवस)
- वसंतराव दादा पाटील (दुसऱ्यांदा मुख्यमंत्री- सांगली मतदार संघ)
२ फेब्रुवारी १९८३ ते ३ जून १९८५ (२ वर्षे १२१ दिवस)
- शिवाजीराव निलंगेकर (निलंगा मतदार संघ)
३ जून १९८५ ते १२ मार्च १९८६ (२८२ दिवस)
- शंकरराव चव्हाण (दुसऱ्यांदा मुख्यमंत्री- विधान परिषदेतून)
१२ मार्च १९८६ ते २६ जून १९८८ (२ वर्षे १०६ दिवस)
- शरदचंद्र पवार (बारामती मतदार संघ)
२६ जून १९८८ ते ४ मार्च १९९० (२ वर्षे ३६४ दिवस)
४ मार्च १९९० ते २५ जून १९९१ आणि ६ मार्च १९९३ ते १४ मार्च १९९५ (२ वर्षे ८ दिवस)
- सुधाकरराव नाईक (पुसद मतदार संघ)
२५ जून १९९१ ते ६ मार्च १९९३ (१ वर्ष २५४ दिवस)
- मनोहर जोशी (दादर मतदार संघ)
१४ मार्च १९९५ ते १ फेब्रुवारी १९९९ (३ वर्षे २५४)
- नारायण राणे (मालवण मतदार संघ)
१ फुब्रुवारी १९९९ ते १८ जानेवारी १९९९ (२५९ दिवस)
- विलासराव देशमुख (लातूर मतदार संघ)
१८ ऑक्टोबर १९९९ ते १८ जानेवारी २००३ (३ वर्षे ९२ दिवस)
- सुशिलकुमार शिंदे (सोलापूर दक्षिण मतदार संघ)
१८ जानेवारी २००३ ते १ नोव्हेंबर २००४ (१ वर्ष २८८ दिवस)
- विलासराव देशमुख (दुसऱ्यांदा मुख्यमंत्री)
१ नोव्हेंबर २००४ ते ८ डिसेंबर २००८ (४ वर्षे ३७ दिवस)
- अशोक चव्हाण (भोकर मतदार संघ)
८ डिसेंबर २००८ ते ७ नोव्हेंबर २००९ (१ वर्ष ३३८ दिवस)
- पृथ्वीराज चव्हाण (विधान परिषदेतून)
११ नोव्हेंबर २०१० ते २८ सप्टेंबर २०१४ (३ वर्षे ३२१ दिवस)
- देवेंद्र फडणवीस (नैॠत्य नागपूर मतदार संघ)
३१ ऑक्टोबर २०१४ ते १२ नोव्हेंबर २०१९ (५ वर्षे १२ दिवस)
- उध्दव ठाकरे (विधान परिषदेतून)
२८ नोव्हेंबर २०१९ ते ३० जून २०२२ (२ वर्षे २१४ दिवस)
- एकनाथ शिंदे (कोपरी-पाचपाखाडी मतदार संघ)
३० जून २०२२ ते ४ डिसेंबर २०२४ (२ वर्षे १५७ दिवस)
पितृतुल्य व्यक्तीमत्व: नागाप्पा कदम
कांही माणसं ध्येयवेडी असतात. आयुष्यात त्यांनी स्वत:चे लक्ष्य निश्चित केलेले असते. ते गाठण्यासाठी ते कोणतेही अग्नीदिव्य पार करण्यात कुचराई करीत नाहीत. आपली माणसं जपतानाच नात्या-गोत्यांचा लवाजमा आपल्या सभोवताली सांभाळून असतात. अशी माणसं जिवनात यशस्वी तर होतातच; शिवाय अशी माणसं पाठीमागे अविस्मरणीय अशा आठवणीदेखील सोडून जातात. असेच एक पितृतुल्य व्यक्तीमत्व म्हणजे मळव (ता. खानापूर) येथील नागाप्पा […]