हरसनवाडी-गवळीवाड्यावरील शेड पाडले; लाकूड चोरीचा आळ
समांतर क्रांती / खानापूर
वननिवासी आणि वनखात्याचा संघर्ष नेहमीचाच बनला आहे. वनखाते नेहमीच वनहक्क कायद्याची पायमल्ली करीत असल्याने खानापूर तालुक्यातील वननिवासींचे जगणे मश्किील झलो आहे. हरसनवाडी – गवळीवाडा येथील गवळी बाबू कोकरे यांच्यावर लाकूड चोरीचा आळ घेत वनकर्मचाऱ्यांने कोणतीही पूर्वकल्पना न देता नव्याने उभारण्यात आलेले पत्र्याचे शेड पाडल्याने संताप व्यक्त होत आहे.
बाबू कोकरे हे जुने घर मोडकळीस आल्याने त्याठिकाणी नव्याने घर उभारत आहेत. घरातील साहित्य ठेवण्यासाठी त्यांनी शेतवडीतून चार निलगिरीचे डांब आणून शेड उभारले होते. सदर लाकडी डांब हे जंगलातून चोरी करून आणल्याचा आळ घेत एका वनरक्षकाने बाबू कोकरे यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता सदर शेड पाडले. त्यामुळे कोकरे यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच काँग्रेस ब्लॉकचे अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी व ग्रा.पं.सदस्य समितीचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन वनरक्षकाची खरडपट्टी केली. गवळी समाजाला नाहक त्रास दिला जात असेल तर गय केली जाणार नाही, असा इशारा ॲड. घाडी यांनी यावेळी दिला. यावेळी हरसनवाडी येथील पंच पावलू फर्नांडीस हे उपस्थित होते.
वनखात्याची दांडगाई कुणावर?
कांही महिन्यांपूर्वी शिरोली परिसरात बेकायदेशीर वृक्षतोड करण्यात आली होती. त्याबाबत तक्रारी आणि अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतरही कुणावरच कारवाई करण्यात आली नाही. हरसनवाडी – गवळीवाड्यावर बाबू कोकरे यांनी शेतवडीतील झाडांचे डांब शेडसाठी वापरल्याने कांही तासात या गरीब गवळ्याचे शेड पाडण्याची तत्परता वनखात्याने दाखविली. त्यामुळे वनखात्याच्या कार्यप्रणालीबाबत संताप व्यक्त होत असून अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी जोर धरत आहे.
याडा-मोहम्मद
गावगोंधळ / सदा टिकेकर जिल्हाधिकारी हे असे अधिकारी असतात, ज्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा असते. बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सुत्रे स्विकारल्यानंतर जो धडाका सुरू केला होता, त्यामुळे ते बेळगावकरांच्या कौतुकास पात्र ठरले. तसेच पोलिस आयुक्त याडा मार्टीन मार्बन्यांग यांनीही ज्या पध्दतीने महानगरातील कायदा-सुव्यवस्था सांभाळली आहे, त्याबद्दल त्यांच्याही धाडसाचे कौतुक होतांना दिसले. गेल्या १ नोव्हेंबरनंतर मात्र या […]