समांतर क्रांती / खानापूर
चालत्या बसमधील प्लायवूड मोडल्याने दोन महिला बसमधून पडल्या आणि चाकाखाली आल्या, पण केवळ सुदैवाने बचावल्याची घटना रुमेवाडी नाका येथे घडली. या घटनेमुळे खानापूर बस आगारातील मोडकळीस आलेल्या बस आणि आगाराचा आंधळा कारभार चव्हाट्यावर आला आहे. बस स्थानक हायटेक झाले तरी येथील बसवाहतूकीचे दिवाळे निघाल्याचे आज पुन्हा एकदा उघडे पडले. Women fell from a moving bus, got crushed under the wheels; but luckily survived!
खानापूर बस आगाराचा कारभार बेशिस्त असल्याने नेहमीच प्रवाशांची गैरसोय होते. आज मात्र आगाराच्या गैरकारभार जवळपास दोन महिलांच्या जीवावर बेतला. केवळ दैव बलवत्तर म्हणून या घटनेत महिला बचावल्या.
याबाबतची अधिक माहिती अशी, निडगल येथील पद्मीणी भुजंग कदम (वय ६५) या गोदगेरी बसने प्रवास करीत होत्या. येथील रुमेवाडी नाक्यावर गतीरोधकावर बस येताच पायाखालील प्लायवूड तुटून पद्मीणी कदम आणि अन्य एक महिला बसखाली पडल्या. त्या चाकाखाली सापणार इतक्यात बस जागीच थांबल्याने त्या थोडक्यात बचावल्या. त्यांना डोक्याला मार बसला असून त्यांच्यावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
खानापूर बस आगारातील बहुतेक बस नादुरूस्त आहेत. त्यांच्या दुरूस्तीकडे परिवहन खात्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. येथील बस आगार हे केवळ नावापुरतेच आहे. लोकप्रतिनिधींच्या सूचनांचे पालनदेखील येथील अधिकारी करीत नसल्याने आगार असून अडचन, नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली आहे.
कर्नाटकाची दंडेलशाही; महाराष्ट्र निद्रिस्त
समांतर क्रांती विशेष कर्नाटक विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आयोजीत करण्यात आलेला महामेळावा उधळून लावण्याचा प्रयत्न कर्नाटकी पोलीसांनी केला. मराठी भाषकांनी या कर्नाटकी दंडेलशाहीला चोख प्रत्यूत्तर देतांना बेळगावातील संभाजी चौकात जोरदार निदर्शने करीत मराठी बाणा दाखवून दिला. एकीकडे मराठी भाषीकांनी कर्नाटकी प्रशासनाची पाचावर धारण बसविली असतांना पोलीस बळाचा वापर करून सुमारे […]