समांतर क्रांती / बेळगाव
कर्नाटक सरकारकडून सीमावासीयांवर होणाऱ्या अन्यायाने परिसीमा ओलांडली असून सर्वोच्च न्यायालयातील खटल्याचा निकाल लागेपर्यंत सीमाभाग केंद्रशासीत करावा, अशी मागणी शिवसेना आमदार माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यसभा सदस्या प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तर खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांना या मागणीचे पत्र पाठविले आहे.
Centralize the Maharastra-Karnatak border areas..
सोमवारी (ता.०९) बेळगावात आयोजीत महामेळावा कर्नाटकी सरकारने उधळून लावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बेळगावमध्ये १०१ कार्यकर्त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. त्याशिवाय कोल्हापूरहून बेळगावकडे येणाऱ्या शिवसैनिकांना (उध्दव बाळासाहेब ठाकरे सेना) कोगनोळी नाक्यावर ताब्यात घेण्यात आले होते.
आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात, कर्नाटकी सरकारचा अन्याय दिवसेदिवस वाढत असून हिवाळी अधिवेशनात सीमाभाग केंद्रशासीत करण्याचा ठराव मांडावा. आम्ही तो एकमताने पारित करू, शे म्हटले आहे. तर खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी, २०२२ मध्ये गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप करून दोन्ही राज्यांनी समन्वयाने राहावे, असे आवाहन केले होते. पण, त्यानंतरही सीमावासीयांवरील अन्याय आणि कर्नाटकी पोलीसांची ‘दंडेलशाही’ थांबलेली नाही. सर्वोच्च न्यायालयात या प्रश्नाची तड लागेपर्यंत सीमाभाग केंद्रशासीत करावा, असे गृहमंत्री अमित शहांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
कर्नाटक सरकारचा निषेध: एकनाथ शिंदे
कर्नाटक सरकारने महामेळावा उधळून लावत मराठी नेते- कार्यकर्त्यांना अटक केली. सीमावासीयांवर कर्नाटक सरकारची अशा प्रकारे दडपशाही सुरू आहे. कर्नाटकाच्या या अशा दंडेलशाही मी निषेध करतो. शिवसेना नेहमीच सीमावासीयांच्या पाठीशी आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्र सीमावासीयांच्या बाजूने असून कर्नाटकाने मर्कटलिलांना आवर घालावा, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
हेम्माडगा येथे वाघाच्या हल्ल्यात म्हैस ठार
खानापूर : भीमगड अभयारण्यात हेम्माडगा येथे वाघाच्या हल्ल्यात म्हैस ठार झाल्याची घटना आज बुधवारी (ता. 11) उघकडकीस आली. म्हैस मालक शेतकरी भीमाप्पा मल्लाप्पा हणबर (रा. तेरेगाळी, ता. खानापूर ) यांना सुमारे 40 हजारांचा फटका बसला आहे.हेम्मडगा येथील जंगलात एक म्हैस आज मृतावस्थेत आढळून आली. म्हशीचा जंगली श्वापदाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून हा हल्ला […]