- समांतर क्रांती / खानापूर
नुकताच झालेल्या अंगणवाडी भरती मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. भाजपच्या एका नेत्याने पाली येथील इसमास तीस हजारांना गंडविल्याची घटना समोर आल्यानंतर तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींच्या गोटातील या नेत्यांने महिला व बाल कल्याण खात्याचा बनावाट शिक्का आणि अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर केला आहे.
पाली येथील शितल प्रविण पाटील यांनी अंगणवाडी शिक्षिकेच्या पदासाठी अर्ज केला होता. मी तुम्हाला नोकरी मिळवून देतो असे सांगत भाजपच्या ‘त्या’ नेत्याने शितल यांचे पती प्रविण पाटील यांच्याकडून तीस हजार रुपये उकळले. पण, शितल यांची वर्णी लागलीच नाही. प्रविण यांनी पैशासाठी तगादा त्या ‘भामट्या’ने महिला आणि बाल कल्याण खात्याच्या नावे बनावट नियुक्तीपत्र दिले. पण, त्याचा हा डाव फसला असून प्रविण पाटील यांनी पोलीसात धाव घेतली आहे.
भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याच्या दबावामुळे अद्यापही प्रविण पाटील यांच्या तक्रारीची दखल घेतली गेलेली नाही. दरम्यान, या घोटाळ्याची गंभीर दखल घेत काँग्रेसने या घोटाळ्याची कसून चौकशी करण्याची मागणी केली आहे. याबाबत अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
- काय म्हणाल्या डॉ. निंबाळकर?
- दरम्यान राष्ट्रीय काँग्रेसच्या सचीव आणि माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनीदेखील या घोटाळ्याची दखल घेतली आहे. त्यांनी ‘‘भाजप खानापूरच्या नेत्याचा अंगणवाडी घोटाळ्यात सहभाग आहे. अंगणवाडी शिक्षिकेच्या नियुक्तीसाठी त्याने ३० हजार घेतले. तेवढ्यावरच न थांबता शिक्का व स्वाक्षरीसह बनावट नियुक्तीपत्र तयार करून पीडितेला दिले. कोणाच्या मार्गदर्शनाखाली आणि पाठिंब्याने त्याला हे करण्याचे धैर्य मिळाले? तालुका, जिल्हा आणि राज्याचे भाजप नेतृत्व याचे समर्थन करत आहे का? गुन्हा दाखल होऊ नये यासाठी पोलिसांवर कोण दबाव आणत आहे? कोणत्या पोलीस अधिकाऱ्याचा या घोटाळ्यात समावेश आहे?’’ असे प्रश्न उपस्थित केले आहेत.
या प्रकरणाची चौकशी करून लवकरात लवकर एफआयआर नोंदवावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. डॉ. निंबाळकर यांनी त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये भाजपच्या एका नेत्याचा फोटोदेखील शेअर केला असून त्यामुळे हाच तर तो नेता नाही ना? असा प्रश्न तालुकावासीयांना पडला आहे.
https://www.facebook.com/share/CJuhaehWng47gtwf
- कोण आहे हा भाजप नेता?
- लोकप्रतिनिधींच्या गोटातील भाजपच्या नेत्यांने हा ‘पराक्रम’ केला आहे. सदर नेता हा गेल्या निवडणुकीतच ‘कुत्र्याच्या छत्री’सारखा अचानक उगवला असून त्यांने जमिनीच्या खरेदी-विक्रीतही अनेकांना चुना लावल्याची चर्चा सुरू आहे. ‘कायद्या’ने वागणाऱ्या या नेत्याला कुणाचा पाठिंबा लाभला आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गळ्यात ‘भगवी’ शाल घालून अशाप्रकारचे काळे कारनामे करणाऱ्या त्या ‘भामट्या’वर कारवाई होणार का? असा प्रश्नदेखील विचारला जात आहे.
- महिला आणि बाल कल्याण खाते गप्प का?
- महिला आणि बाल कल्याण खात्याचे लेटरहेड, बनावट शिक्का आणि अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरीचा वापर करून हा घोटाळा करण्यात आला असतांना खात्याचे अधिकारी गप्प का? याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. खरंतर, संबंधीत खात्याने तात्काळ यासंदर्भात पोलीसात गुन्हा नोंदविणे आवश्यक आहे. परंतु, येथील अधिकारी सुध्दा यामध्ये सहभागी आहेत का? अशी शंका त्यांच्या वागणुकीवरून येत आहे.
कामतगा ते सावरगाळी आणि आता नंदगडात..आनंदगडाला वळसा..
(लवकरच अंगणवाडी घोटाळ्यांचा परामर्श घेणारा विशेष रिपोर्ट प्रसिध्द करीत आहोत.)
मणतुर्गा भागातील प्रवाशांचा प्रवास सुकर..
समांतर क्रांती / खानापूर गेल्या दहा वर्षांपासून खड्ड्यांनी साम्राज्य प्रस्तापीत केलेल्या रुमेवाडी नाका ते मणतुर्गा क्रॉसपर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने प्रवाशातून समाधान व्यक्त होत आहे. या रस्त्याची डागडूजी व्हावी, यासाठी अनेकवेळा आंदोलने, अर्ज विनंत्याा करून पाठपुरावा करण्यात आला होता. आता या भागातील प्रवाशांचा प्रवास सुकर झाला आहे. शेडेगाळी ते मणतुर्गा क्रॉसपर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दयनीय आवस्था […]