समांतर क्रांती / खानापूर
जांबोटी येथील जांबोटी मल्टीपर्पज पतसंस्थेच्या २०२५ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन शुक्रवारी थाटात संपन्न झाले. तालुक्यातील पतसंस्था असलेल्या जांबोटी पतसंस्थेच्यावतीने दरवर्षी दिनदर्शिकेचे प्रकाशन केले जाते. तसेच ही दिनदर्शिका सभासद आणि ग्राहकांना मोफत वाटली जाते, अशी माहिती यावेळी संस्थेच्यावतीने देण्यात आली.
सचीव भैरू पाटील यांनी स्वागत केले. त्यानंतर उपस्थितांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
प्रसंगी बोलतांना अध्यक्ष विलास बेळगावकर म्हणाले, पश्चिम भागातील जनतेला आर्थिक बळ देण्यासाठी १९९३ साली संस्थेची स्थापना केली. जनतेने दिलेल्या प्रतिसादामुळे संस्थेने यशस्वीरित्या ३२ वर्षांचा कार्यकाल पूर्ण केला आहे. या काळात गरजवंतांचे आर्थिक सबलीकरण हे आमचे ध्येय राहिले. त्यात आम्ही संस्थाचालक यशस्वी झाल्याचे आम्हास समाधान आहे.
यावेळी माजी जि.पं.सदस्य नारायण कार्वेकर, काँग्रेस ब्लॉकचे अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी, पत्रकार प्रकाश देशपांडे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष पिराजी कुऱ्हाडे, उपाध्यक्ष वासुदेव चौगुले, पत्रकार विवेक गिरी यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल विचार मांडले.
तालुक्यातील पहिली पतसंस्था असलेल्या जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीने त्या काळात सहकाराचे रोपटे लावले. त्याचा वेलू गगणावरी गेला आहे. पण, अलिकडे राजकारणामुळे सहकार क्षेत्र धोक्यात आले आहे. केवळ राजकीय फायद्यासाठी होणाऱ्या गैरवापरामुळे पतसंस्था रसातळाला जाऊन सर्वसामान्य माणूस संकटात सापडला आहे. जांबोटी पतसंस्था या ला अपवाद ठरली. लोकांचा विश्वास संपादन करून संस्थेने अनेकांना अर्थसहाय्य केलेच, शिवाय जांबोटीसारख्या दुर्गम भागातील गोरगरिब जनतेला काटकसरीची सवय लावली, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
याप्रसंगी संचालक अन्नासाहेब कुडतुरकर, विद्यानंद बनोशी, पांडुरंग नाईक, शाहू गुरव, यशवंत नाईक, हणमंत काजुनेकर, खाचाप्पा काजुनेकर, पुंडलिक गुरव, बी.एस.कुर्लेकर, भरमाणी नाईक, संचालिका जी.व्ही.इंगळे, सरस्वती पाटील, शाखा व्यवस्थापक सुर्यकांत बाबशेट आदी उपस्थित होते.
ग्राम पंचायत निवडणुकाही पक्षाच्या चिन्हावर
समांतर क्रांती / ब्यूरो रिपोर्ट लोकसभा, विधानसभा आणि तालुका व जिल्हा पंचायत निवडणुका या पक्षचिन्हावर लढविल्या जातात. पण, ग्राम पंचायतीच्या निवडणुकांमध्ये पक्ष चिन्ह दिले जात नाही, तर इतर चिन्हावर निवडणूक लढविली जाते. आता मात्र ग्राम पंचायतीच्या निवडणुकात सुध्दा पक्षाचे चिन्हावर होणार असल्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. महानगरपालिका, नगर पालिका आणि नगर पंचायतींना सुध्दा अद्याप […]