समांतर क्रांती / रामनगर
भरधाव कार मंदिरात घुसल्याने सतीदेवी मंदिर जमिनदोस्त झाल्याची घटना शनिवारी (ता.२१) धारवाड-पणजी महामार्गावर चिंचेवाडी येथे घडली. या अपघातात कारमधील प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना धारवाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सदर कार रामनगरकडून कुंभार्डाच्या दिशेने निघाली असतांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार (के.ए. ५१ एमयु ४८३३) थेट मंदिरात घुसली. यावेळी कौलारू सतीदेवी मंदिराचे छप्पर कारवर कोसळले. त्यामुळे कारसह प्रवासी त्याखाली अडकले होते. नागरीकांनी त्यांना कारसह बाहेर काढले. हे प्रवासी केवळ सुदैवाने या अपघातातून बचावले. लोंढा पोलिस चौकीतील पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सर्व जखमींना धारवाडला हलविण्यात आल्याने अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही, असे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास सुरू आहे.
खानापूर तालुक्यात रविवारी वीज पुरवठा खंडीत
समांतर क्रांती / खानापूर Power supply disrupted in Khanapur taluka on Sunday दुरूस्तीच्या कारणास्तव उद्या रविवारी (ता.२२) खानापूर तालुक्यातील उचवडे, जांबोटी, हब्बनहट्टी, देवाचीहट्टी, कालमणी, आमटे, चिखले, पारवाड, कणकुंबी, चिगुळे, हुळंद, चोर्ला आणि मान येथील वीज पुरवठा खंडीत राहणार आहे, असे हेस्कॉमने कळविले आहे.