समांतर क्रांती / खानापूर
हत्तींनी तालुक्याच्या दक्षिण आणि पूर्व भागात अक्षरश: हैदोस मांडला आहे. रविवारी हत्तीने सावरगाळीतील शिवारात धुडगूस घालून शेती अवजारांसहीत ऊसाचे प्रचंड नुकसान केले. गेल्या आठवडाभरापासून हत्तीच्या कळपाचा या परिसरात वावर असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
नुकताच जळगे येथील मळणीच्या खळ्यावर हत्तीने धुडगू घातल्याची घटना ताजी असतांनाच सावरगाळी येथे त्याने दहशत माजविली आहे. रविारी ज्ञानेश्वर जायाप्पा पाटील यांच्या शेतातील ऊस पिकासह पाण्याची मोटर, जलकुंभ आणि शेतीच्या आवजारांचे प्रचंड नुकसान केले.
गेल्या आठवड्यापूर्वी पाच हत्तींचा एक कळप या परिसरात आला होता. त्यातील कांही हत्ती आनंदगडाला वळसा घालून नंदगड डॅम परिसरात दाखल झाले होते. त्यातील एका हत्तीने पुन्हा सावरगाळी परिसरात दहशत माजविली असल्याने शेतकऱ्यांना शिवारात जाणे धोक्याचे बनले आहे. वन खाते या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मेंडीलवासियांची व्यथा ;विजेचा नाही पत्ता
समांतर क्रांती / खानापूरदेशातील प्रत्येक गावात वीज पोहचल्याची घोषणा केंद्रातल्या मोदी सरकारने दहा वर्षांपूर्वी केली. पण, खानापूर तालुक्यातील काही गावांना अद्यापही वीज पोहचली नाही. मेंडील या दुर्गम खेड्यात स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतरही वीज पोहचली नसल्याने हे गाव अंधारात चाचपडत आहे.मेंडील ग्रामस्थांनी आज सोमवारी (ता. 23) येथील हेस्कॉम कार्यालयाला धडक दिली. सात वर्षांपूर्वी मेंडील गावात विजेऐवजी सौरऊर्जेची […]