समांतर क्रांती / खानापूर
देशातील प्रत्येक गावात वीज पोहचल्याची घोषणा केंद्रातल्या मोदी सरकारने दहा वर्षांपूर्वी केली. पण, खानापूर तालुक्यातील काही गावांना अद्यापही वीज पोहचली नाही. मेंडील या दुर्गम खेड्यात स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतरही वीज पोहचली नसल्याने हे गाव अंधारात चाचपडत आहे.
मेंडील ग्रामस्थांनी आज सोमवारी (ता. 23) येथील हेस्कॉम कार्यालयाला धडक दिली. सात वर्षांपूर्वी मेंडील गावात विजेऐवजी सौरऊर्जेची सोय करण्यात आली होती. पण अवघ्या काही वर्षातच पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी स्थिती निर्माण झाली. सौर विजेची योजना फोल ठरल्यानंतर पुन्हा नव्याने जनरेटर देण्यात आले पण त्यामध्ये कायम डिझेल कोण घालणार हा प्रश्न गंभीर बनला. सध्या सात महिन्यांपासून हे गाव अंधारात आहे, अशी कैफियत नागरिकांनी मांडली.
विजेअभावी गावात हिस्त्र जंगली प्राणी आल्याचे लक्षात येत नाही. परिणामी नागरिकांना रात्री घराबाहेर पडणे धोक्याचे बनले आहे. तसेच वीज नसल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सुद्धा अवघड झाले आहे. त्यासाठी लवकरात लवकर विजेची सोय करावी, असे शिक्षक नामदेव अनगोळकर यांनी सांगितले.
यावेळी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी येत्या चार दिवसात सौर ऊर्जेवर चालणाऱ्या विजेची सोय केली जाईल, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले आहे. यावेळी विजय मादार,शिक्षक नामदेव अनगोळकर, मष्णू पाटील, रमेश पाटील, कृष्णा पाटील, भीमराव पाटील, दीपक गवाळकर आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पाचवी ते आठवी: ढकलगाडी बंद, नापास तर नापासच!
समांतर क्रांती / ब्यूरो रिपोर्ट शिक्षण क्षेत्रात टीकेचा विषय ठरलेला पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून पुढच्या इयत्तेत प्रवेश देण्याचं धोरण केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अखेर रद्द केलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नो डिटेंशन पॉलिसी संपुष्टात आणली आहे. परिणामी, नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची ढकलगाडी आता थांबणार आहे. आता पाचवी ते आठवीच्या वार्षिक परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना […]