समांतर क्रांती / कलारंग
Shyam Benegal दिग्दर्शक शाम बेनेगल यांचे वयाच्या ९० व्या वर्षी सोमवारी (ता. २३) रात्री निधन झाले. त्यांच्या जाण्याने बॉलिवूड क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
श्याम बेनेगल यांचा जन्म १४ डिसेंबर १९३४ रोजी एका कोकणी भाषिक चित्रापूर सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला. ते बारा वर्षांचे असताना त्यांचे छायाचित्रकार वडील श्रीधर बी. बेनेगल यांनी त्यांना दिलेल्या कॅमेऱ्यावर त्यांनी पहिला चित्रपट बनवला. हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात एम.ए. केले आणि तेथेच त्यांनी हैदराबाद फिल्म सोसायटीची स्थापना केली.
१९७४ साली त्यांनी ‘अंकूर’ हा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला. तर ‘मुजीब-द मेकींग ऑफ नेशन’ हा त्यांनी २०२३ मध्ये दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट ठरला. त्यांनी १९९६ मध्ये त्यांनी महात्मा गांधीजींच्या जीवनावर अधारीत ‘द मेकिंग ऑफ द महात्मा’ तर २००५ मध्ये सुभाषचंद्र भोस यांच्यावर अधारीत ‘नेताजी सुभाषचंद्र भोस-द फोर्गटन हिरो’ हा चित्रपट केला. त्यांचे अनेक चित्रपट गाजले.
श्याम बेनेगल यांना मिळालेले पुरस्कार
- २०१३ सालचा कलामहर्षी बाबूराव पेंटर जीवनगौरव पुरस्कार
- पद्मश्री पुरस्कार
- पद्मविभूषण पुरस्कार
- दादासाहेब फाळके पुरस्कार
- २०१८ सालचा चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार
भीषण अपघातात तिघे ठार
समांतर क्रांती / अळणावर ट्रक आणि टेम्पो ट्रॅव्हलर यांची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात तिघे ठार झाल्याची घटना अळणावर तालुक्यातील कटबगट्टीजवळ घडली. या अपघातात मृत झालेले तिघेही सौंदत्ती तालुक्यातील शिरसंगीचे आहे. हणमंत मल्लाड (३६), महांतेश चव्हाण (३७) महादेवप्पा हुलळ्ळी (३९) अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी (ता.२३) पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले. ट्रक […]